Nagin 7 VFX Blunder: एकता कपूरच्या 'नागिन 7 ' (Nagin 7) या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये नेटकऱ्यांना एपिसोडमधील VFXमधील एक मोठी चूक लक्षात आली आहे. एका चुकीमुळे मालिकेच्या निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला ट्रोल करण्यात सुरुवात केली. टीव्ही मालिकांची क्वीन म्हणून ओळखली जाणारी एकता कपूर (Ekta Kapoor) पुन्हा एकदा यामुळे चर्चा झाली आहे.  नागिन 7 मालिकेत झालेल्या चुकीमुळे एकता कपूरच्या सिरीयलचा सगळीकडे हसं झालं.  अनेकांनी तर याला ' TV इंडस्ट्रीतील सर्वात मोठे VFX अपयश ' म्हटलं. अनेकांनी सोशल मीडियावर एकता कपूर आणि तिच्या शोच्या एडिटरला ट्रोल करायला सुरुवात केली. हे पाहून एकता कपूर आपल्या एडिटरच्या चुकीसाठी पुढे आली. एडिटरला बोलतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. (Nagin 7 VFX Mistake)

Continues below advertisement

नेमकी चूक काय झाली ?

एकता कपूरची लोकप्रिय मालिका 'नागिन' चा सध्या सातवा सिझन चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय . पण यावेळी कारण मालिकेचे कथानक नसून यात घडलेली एक मोठी व्हीएफएक्स चूक आहे. मुळात झालं असं की एपिसोडमधील एका ॲक्शन सीन दरम्यान शोचा एडिटर मागे असणारी ब्ल्यू स्क्रीन एडिट करायला विसरला. एपिसोड मध्ये ॲक्शन सिक्वेन्सच्या वेळी दिसणारी ब्ल्यू स्क्रीन सगळ्यांनाच दिसली.त्यामुळे मालिकेमधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच शोच्या निर्मितीचा दर्जा आणि एडिटिंग टीमवर प्रश्नचिन्ह  उपस्थित करण्यात आले. एकता कपूरसारख्या निर्मातीकडून, एवढी मोठी चूक कशी झाली ? असे सवाल उपस्थित केले जाऊ लागले. आपला एडिटर ट्रोल होत असल्याचं पाहून एकता कपूर आपला एडिटरला वाचवण्यासाठी समोर आली.

एडिटरच्या चुकीनंतर एकताचा Video व्हायरल 

या VFX एक्स ब्लंडरवर एक व्हिडिओ करून तिने आधी आपल्या एडिटरची ओळख करून दिली.  ती म्हणाली ' विक्कीजीं भेटा . यांनी केलेल्या ब्ल्यू स्क्रीनची चर्चा सगळ्या मुंबईत आहे सध्या. मी माझा लव्हर बदलू शकते, पण विकीजींना बदलू शकत नाही ' असं एकता म्हणाली. ती हे सगळं हसत खेळत बोलत होते. ती पुढे म्हणाली ' मी जर 50 शो बनवले तर त्या सगळ्या गोष्टी एकहाती सांभाळणारा माणूस म्हणजे विक्कीजी आहेत. तो जगातला सगळ्यात बेस्ट एडिटर आहे. ज्या ज्या लोकांनी माझ्या टीमला आणि त्यांना रोल केले आहे त्यांनी आधी विकीजींची माफी मागायला हवी. कारण ते या क्षेत्रातील उत्कृष्ट एडिटर आहेत. विकी जी तुसी ग्रेट हो ! गेल्या वीस वर्षात आम्ही निर्मिती केलेल्या प्रत्येक शोचे संपादन हे विकीजींनीच केले आहे."

Continues below advertisement

ती म्हणाली, दिग्दर्शक बदललेले लेखक बदलले पण संपादक नाही. हा एकटाच असा माणूस आहे जो आमचं सगळं काम करतो. 50 शो असले तरी आमचा एकच एडिटर आहे, विक्कीजी. यांना आम्ही जरा जास्तच कामाला लावलंय. आम्ही यांना पूर्ण रात्र जागे ठेवतो. यावेळी जरा जास्त झालं वाटतं.' असं एकता म्हणाली. नागिन ही टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. प्रत्येक सीजनला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळाले आहे. नागिन 7 या मालिकेकडून चहात्यांना खूप अपेक्षा आहेत. मात्र व्हीएफएक्स च्या या गोंधळामुळे सोशल मीडियावर या शोबद्दल चर्चा सुरू झाली आहे.