Pravin Tardes Deool Band 2: बहुचर्चित 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) सिनेमा 21 मे 2026 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाला (Box Office Collection) 6 दिवसांत प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शित होण्यापूर्वीच या सिनेमाची (Entertainment) प्रचंड चर्चा झाली.  पहिल्या तीन दिवसांत या सिनेमाने 10 कोटींचा टप्पा गाठला.  ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना पुन्हा एकदा  स्वामी समर्थ यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी अनेकांनी  सिनेमागृहात गर्दी केली.  स्नेहल तरडे यांचीही प्रमुख भूमिका  आहे.  प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' सिनेमाने सहा दिवसांत किती कोटींचा गल्ला जमवला? पाहूयात. 

Continues below advertisement

6 दिवसांत 'देऊळ बंद 2' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Mohan Joshi as Swami Samarth in Deool Band 2)

प्रवीण तरडे दिग्दर्शित आणि मोहन  जोशी अभिनीत 'देऊळ बंद 2'  सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी केली.   पहिल्या दिवशी या सिनेमाने 3.5 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले.  तर, दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 3.11 कोटींचे कलेक्शन केले.  तिसऱ्या दिवशी या सिनेमाने  5.21 कोटींचे कलेक्शन केले. तर, चौथ्या दिवशी या सिनेमाने 5.90 कोटी कमावले आहेत. दरम्यान, पाचव्या दिवशी या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये घट झाली.  पाचव्या दिवशी या सिनेमाने 3.40 कोटी कमावले आहेत. 

सॅकनिल्क ट्रेंड रिपोर्ट्सनुसार,  प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी म्हणजेच 26 मे 2026 रोजी या सिनेमाने 3.35 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.  एकूण 1,863 शोजमधून बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले आहे.  आतापर्यंत भारतात या सिनेमाने 26.48 कोटींचे ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. सहा दिवसांत 'देऊळ बंद 2'  या सिनेमाची उत्तम घौडदौड सुरू आहे. येत्या काळात 'देऊळ बंद 2'   हा सिनेमा किती चित्रपटांचा रेकॉर्ड मोडतोय?  किती कोटींचा गल्ला कमावतोय, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

Continues below advertisement

'देऊळ बंद' सिनेमात स्नेहल तरडेंची महत्त्वाची भूमिका (Mohan Joshi Starrer Deool Band 2 Wins Audience Hearts)

 

 'देऊळ बंद' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर 'देऊळ बंद 2'  या सिनेमालाही प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमात मोहन जोशी स्वामी समर्थ यांच्या भूमिकेत आहेत.  या सिनेमात शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, सरकारी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा होणारा छळ, हे वास्तव या सिनेमातून मांडण्यात आलं आहे.  विशेष म्हणजे या सिनेमात स्नेहल तरडे यांचीही प्रमुख भूमिका आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

आंबनेळी घाटातील थरारक अपघातात मराठी अभिनेत्यानंही जीव गमावला; 8 जणांसोबत स्कॉर्पिओत होता कलावंत

ABP माझाच्या बातम्या LIVE...