Deewar Young Amitabh Bachchan Quit Fiilms Left Country: सध्या टॉप बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywod Celebrity) अगदी लहान वयातच सिनेसृष्टीत पदार्पण केलं. यामध्ये अगदी कमल हसन (Kamal Hasan), कुमाल केमू (Kunal Kemu), सचिन पिळगांवकरांपासून ते सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi), रेखा (Rekha), उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होतो. अनेक सेलिब्रिटींनी बालपणात पदार्पण करुन अगदी शेवटपर्यंत सिनेसृष्टी गाजवली, तर अनेकांनी बालपणी सिनेमांमध्ये काम केलं, पण नंतर इंडस्ट्रीतून काढता पाय घेतला. असंच एक उदाहरण आहे, 'मास्टर अलंकार' (Master Alankar) म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याचं.
70 च्या दशकात गाजलेला सिनेमा अमिताभ बच्चन स्टारर 'दीवार' (Deewar Movie). या सिनेमात बिग बींनी धुमाकूळ घातलेला. या सिनेमात 'मास्टर अलंकार' म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका बालकराकारानं अमिताभ बच्चन यांच्या बालपणाची भूमिका साकारलेली. मोठं झाल्यानंतरही त्यांनी अनेक सिनेमे केले, पण नंतर ते अचानक सिनेसृष्टीतून गायब झाले. 'मास्टर अलंकार' हे 70 च्या दशकातील सर्वात प्रसिद्ध बालकलाकारांपैकी एक. एक काळ असा होता की, त्यांची गणना सर्वाधित मानधन घेणाऱ्या बालकलाकारांमध्ये केली जाऊ लागली. पण कालांतरानं या बालकलाकारानं इंडस्ट्रीतून एग्झिट घेतली. तेव्हापासून 'मास्टर अलंकार' कोणत्याच सिनेमात दिसले नाहीत. मग ते अचानक गेले कुठे? आता ते काय करतात? जाणून घेऊयात सविस्तर...
'मास्टर अलंकार' मोठे झाल्यानंतर अलंकार जोशी (Alankar Joshi) बनले. अलंकार जोशींनी इंडस्ट्री सोडली, पण सध्या त्यांची मुलगी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री आहे. 'दीवार' व्यतिरिक्त, अलंकार जोशींनी 'सीता और गीता' आणि 'मजबूर' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. अलंकार जोशींची आणखी एक ओळख सांगायची तर, अभिनेत्री आणि सुत्रसंचालिका पल्लवी जोशीचा भाऊ. आणि विवेक अग्निहोत्रींचा मेहुणा.
'मास्टर अलंकार' यांना 'दीवार' सिनेमा कसा मिळाला?
पल्लवी जोशीनं अलिकडेच 'फ्रायडे टॉकीज'ला दिलेल्या मुलाखतीत तिचा भाऊ अलंकार जोशीबद्दल सांगितलं. तिनं सांगितलं की, यश चोप्रांनी 'दीवार'मध्ये अमिताभच्या बालपणीच्या विजयच्या भूमिकेसाठी अलंकार जोशींची निवड कशी केली? याबाबत माहिती दिली. पल्लवी जोशी म्हणाली की, "दीवार'साठी माझ्या भावाला बोलावण्यात आलं होतं आणि आम्ही यशजींना भेटायला गेलो होतो. मीही त्यांच्यासोबत गेलो होतो, जेव्हा आम्ही सेटवर भेटायला गेलो, तेव्हाची एक अस्पष्ट आठवण मला आहे..."
अमिताभ बच्चन म्हणालेले, "याला माझ्या बालपणीचा रोल देऊन टाका..."
पल्लवी जोशीनं पुढे बोलताना सांगितलं की, "सिनेमाची शुटिंग सुरू झालेली, तेवढ्या अमिताभ बच्चन यांनी माझ्या भावाला पाहिलं आणि म्हणाले की, "अरे कसा आहेस?" नंतर, त्यांनी यश चोप्रांना सांगितलं की, "याला (अलंकार जोशी) माझ्या बालपणीचा रोल देऊन टाका..." त्यानंतर दादाला 'दीवार' सिनेमात कास्ट करण्यात आलं आणि त्यानं छोट्या विजयची भूमिका साकारली.
अलंकार जोशींनी सांगितलेलं इंडस्ट्री सोडण्याचं कारण
यापूर्वी, अलंकार जोशींनी 'टाइम्स नाऊ'शी बोलताना त्यांच्या इंडस्ट्रीतल्या काही दिवसांची आठवण करुन दिली आणि मोठं झाल्यावर अभिनय सोडण्याचं कारणंही सांगितलं. अलंकार जोशी म्हणाले की, "दिवसभर काम करणं, रात्री शुटिंग करणं आणि सार्वजनिक ठिकाणी येताना प्रचंड गर्दीचा सामना करणं... यासाठी एका दिग्गज कुटुंबाचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. माझ्या पालकांनी मला महत्त्वाच्या गोष्टींकडे वळण्यासाठी मदत केली. मला लहानपणापासून कौतुक आणि शाबासकीचा विनम्रतेनं स्विकारायचं, पण कधीही आपलं मूळ विसरायचं नाही, असं शिकवण्यात आलेलं.
आता यशस्वी मराठी फिल्ममेकर, 200 कोटींची संपत्ती
जेव्हा अलंकार जोशी मोठे झाले आणि हिरो म्हणून सुरुवात करायची इच्छा होती, तेव्हा त्यांना विशेष भूमिका मिळाल्या नाहीत. पल्लवी जोशी एका मुलाखतीत म्हणालेली की, अलंकार दादाला तेव्हा कळलं होतं की, बाल कलाकार म्हणून त्याला मिळालेली प्रसिद्धी आणि नाव मोठं झाल्यावर तो अभिनेता बनल्यानंतर मिळणार नाही. म्हणूनच अलंकार जोशी यांनी अभिनय सोडला. त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनात प्रवेश केला. आज ते एक यशस्वी मराठी चित्रपट निर्माते आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती सध्या 200 कोटी रुपये म्हणजेच, 2 अब्ज रुपये असल्याचं म्हटलं जातंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :