Deepika Padukone : राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. रामलल्लाच्या अभिषेकनंतर एकमेकांसोबत फोटो क्लिक करताना सुद्धा दिसले. मात्र, बॉलीवूडचे सर्वात रोमँटिक कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. बाॅलिवूडमधील किंग शाहरुख खान, अमीर खान आणि सलमान दीपिका-रणवीरसोबत सैफ अली खान आणि करीना कपूर सोहळ्यात सहभागी नव्हते.
दिपिकाने घरी पणती लावली
दरम्यान, दिपिका आणि रणबीरने निमंत्रण मिळाले नसले, तरी घरी त्यांनी राम मंदिर अभिषेक सोहळा साजरा केला आहे. दिपका आणि रणबीरने इन्स्टाला स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पणती लावल्याचे दिसून येते. दुसरीकडे, राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमात आलिया भट्ट पती रणबीर कपूरसोबत बसली होती. कतरिना कैफ आणि विकी कौशलही त्यांच्या मागे बसलेले दिसले. आयुष्मान खुराना, माधुरी दीक्षित, दक्षिणेचा देव म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रजनीकांतही उपस्थित होते.
या कार्यक्रमात बॉलिवूडची ड्रीम गर्ल हेमा मालिनीही सहभागी झाली होती. यावेळी ती मंदिरासमोर उभी राहून पोज देताना दिसली. साउथ स्टार राम चरणने सुद्धा राम मंदिराच्या उद्घाटनाला हजेरी लावली. बॉलिवूडचे नवविवाहित जोडपे रणदीप हुड्डा आणि लिन लैश्राम हेही राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत पोहोचले. श्रेयस तळपदेनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयस म्हणतो, "नमस्कार, अयोध्येत प्रभू श्री रामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपल्या हयातीत आपल्याला हा क्षण अनुभवता आला याच्यापेक्षा सौभाग्य काय असू शकतं.जय श्री राम!".
आज अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 84 सेकंदांचा अत्यंत सूक्ष्म मुहूर्त होता. काशीचे ज्योतिषी पंडित गणेशवर शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त निवडला होता. हा शुभ मुहूर्त फक्त 84 सेकंदांचा असतो. दुपारी 12:29:80 वाजता सुरू होईल आणि 12:30:32 वाजता संपला.
इतर महत्वाच्या बातम्या
- Ram Mandir : अख्ख्या बाॅलिवूडला राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण, पण किंग शाहरुख, सलमान, अमीर अन् दीपिकाला वगळले!