Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हिने सप्टेंबर महिन्यांत गोंडस लेकीला जन्म दिला. रणवीर (Ranveer Singh) आणि दीपिकाने त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव दुआ असं ठेवलंय. त्यामुळे आता चाहते रणवीर आणि दीपिकाच्या लेकीची झलक पाहण्यासाठी चाहतेही उत्सुकत झालेत. नुकतच बंगळुरु एअरपोर्ट लाडक्या लेकीसोबत स्पॉट झाली. पण यावेळीही दुआच्या चेहरा काही दिसला नाही. कारण दीपिकीने दुआला अगदी तिच्या उराशी घट्ट कवटाळून घेतलं होतं.
दीपिकाने रेड कलरचं शर्ट घातलं होतं. तिच्याजवळ तिची लाडकी लेक दुआ होती. लाडकी लेक झाल्यापासून दीपिका ही तिच्या लेकीसाठी वेळ घालवत असल्याचं पाहायला मिळतंय. लेकीला जन्म दिल्यापासून दीपिका फार कुठेच दिसली नव्हती. पण नुकतच तिने दिलजित दोसांजच्या लाईव्ह कॉन्सर्टला हजेरी लावली. त्यानंतर आता नुकतच बंगळुरु एअरपोर्टला मायलेकी एकत्र स्पॉट झाल्या आहेत.
आई झाल्यानंतर 'अशी' झालीय दीपिका पदुकोणची अवस्था
दीपिका सध्या प्रोफेशनपासून दूर असली तरी ती तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांशी सतत जोडलेली राहण्याचा प्रयत्न करते. दीपिका सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. दीपिका तिच्याबद्दल आणि बाळाबद्दलचे अपडेट्सही चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी दीपिकाने मुलीच्या पायांचा फोटो शेअर करत तिच्या नामकरणाची घोषणा केली होती. दीपिकाने त्यानंतर इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली. ज्यामध्ये तिने आई झाल्यानंतर तिची अवस्था कशी झाली आहे, याबद्दल सांगितलं.
या वर्षी 8 सप्टेंबर 2024 ला दीपिकाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. लग्नाच्या 6 वर्षानंतर, दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आई-बाबा झाले. यानंतर दीपिका फार घराबाहेर पडताना दिसत नाही. त्याचप्रमाणे तिने मीडिया अपीअरेंस कमी झाले आहेत. पण नुकतीच बंगळुरु एअरपोर्टवर तिच्या लाडक्या लेकीसोबत दुआ स्पॉट झाली.