Deepika Padukone-Ranveer Singh :  बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं रणवीर (Ranveer Singh) आणि दीपिकाने (Deepika Padukone) सप्टेंबर महिन्यात त्यांच्या लेकीचं स्वागत केलं. त्यांनी त्यांच्या लाडक्या केलीचं बारसंही नुकतच केलंय. दीपिका आणि रणवीरने त्यांच्या लेकीचं नाव दुआ असं ठेवलंय. त्यामुळे सोशल मीडियावर दीपिका आणि रणवीरला सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. दीपिका आणि रणवीरने दिवाळीच्या मुहूर्तावर त्यांच्या लेकीचं नाव शेअर केलं होतं. त्यांनी त्यांच्या लेकीच्या नावाचा अर्थही यावेळी सांगितला. 


रणवीर आणि दीपिकाने शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'दुआ पदुकोण सिंग.. दुआ म्हणजे प्रार्थना. कारण तेच आमच्या प्रार्थनेचे उत्तर आहे.. आमचं हृदय प्रेमाने आणि कृतज्ञतेने भरलंय. पण दीपिका-रणवीरच्या लेकीचं नाव दुआ हे अनेकांना आवडलं नसल्याचं चित्र सध्या सोशल मीडियावर आहे. 


दीपिका रणवीर झाले ट्रोल


दीपिका आणि रणवीरच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करुन त्यांना ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावरील युजर्सचा दावा आहे की दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी त्यांच्या मुलीचे नाव मुस्लिम ठेवले आहे. त्यामुळे धर्मावरुन प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. एका युजरने कमेंट करत म्हटलं की, दुआ नाही प्रार्थना.. दुसऱ्या एका युजरने कमेंट् करत म्हटलं की, 'हा अरबी किंवा मुस्लिम शब्द आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे हिंदू आहात? याशिवाय एकाने टिप्पणी केली की, 'हिंदू नावांची कमतरता होती का?'


दीपिका-रणवीर 8 सप्टेंबरला आई-वडील झाले


दीपिका पदुकोणने 8 सप्टेंबरला एका मुलीला जन्म दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून रणवीर आणि दीपिकाने ही गुडन्यूज त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यावेळी करीना कपूर खान ते सारा अली खान यांसारख्या सेलिब्रिटींनीही या जोडप्याचे अभिनंदन केले होते.


दीपिका-रणवीरचा वर्क फ्रंट


वर्क फ्रंटवर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण सिंघम अगेनमध्ये एकत्र दिसणार आहेत. आई-वडील झाल्यानंतर ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 






ही बातमी वाचा : 


Bhau Kadam : शरद पवारांनीही नाटकात काम केलं होतं, अजित पवारांचे स्टार प्रचारक भाऊ कदमने सांगितला 'तो' किस्सा