Swanandi Sardesai Marriage: "ऐका ना.." अशी निखळ हाक मारत सोशल मिडियावरच्या वेगवान दुनियेत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी लोकप्रिय इन्फ़्लुएन्सेर आणि गायिका स्वानंदी सरदेसाई (Swanandi Sardesai) लग्नबंधनात अडकली आहे. रविवारी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तिने लग्न केलंय. सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत तिने तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिलीय. तिच्या पोस्टवर अनेकजण तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

Continues below advertisement

'दशावतार' फेम गायिका अडकली लग्नबंधनात 

स्वानंदीने रविवारी 19  एप्रिल रोजी लग्न केल्याची माहिती तिच्या पोस्टमधून दिली आहे. स्वानंदीच्या पतीचं नाव विक्रांत रामदास असं आहे. आजकाल करतात तसा कुठलाही बडेजाव न करता तिने अतिशय सध्या आणि पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधलीय. हिरव्या नववारी साडीत तिचं सौंदर्य खूप खुलून दिसतंय. नाकात मोत्याची पारंपारिक नथ, हिरवा चुडा, चंद्रकोर  आणि गळ्यात हार अशा लुकमध्ये तिने तिचा नवरा विक्रम रामदाससोबत फोटो पोस्ट केलाय.स्वनंदीचा  नवरा विक्रम रामदास हा लेखक आणि दिग्दर्शक आहे. त्याने  इंदिरा नावाची एक शोर्टफिल्म केलीय. त्याचाही लुक स्वनंदीला शोभेल असा आहे. पांढऱ्या रंगाचं धोतर, सदरा आणि शेला परिधान करत पारंपरिक लूक त्याने केलाय . 

स्वानंदी ही लोकप्रिय मराठी युट्युबर तर आहेच पण उत्तम गायिकाही आहे. कोकणच्या मातीतल्या या गायिकेने आपल्या साध्या जीवनशैलीच्या व्हिडिओंनी लाखो प्रेक्षकांचे मन जिकून घेतले आहे. स्वानंदी आपल्या युट्यूब चॅनेलवर कोकणातील ग्रामीण जीवन, निसर्ग आणि दैनंदिन व्हिडिओ शेअर करतात, ज्याला लाखो व्ह्यूअर्स मिळतात. शिवाय दिलीप प्रभावळकर यांच्या दशावतार चित्रपटात तिने एक गाणंही गायलंय. ती शास्त्रीय संगीत तर गातेच पण ती उत्तम चित्रकारही आहे. तिच्या सोशल मिडीयावरून  कोकणातील व्हिडीओ ती शेअर करत असते. याशिवाय सुमधूर आवाजातील गाणीही स्वानंदी चाहत्यांसोबत शेअर करते.