मुंबई- क्रूझ ड्रग्स प्रकरणात मुंबई कोर्टाने शाहरुख खान (Shah Rukh Khan) चा मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज फेटाळला आहे. याचा अर्थ आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये राहावे लागेल. आर्यनसोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सध्या आर्यनची आई गौरी खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गौरी रडताना दिसत आहे.
आर्यनला जामीन न मिळाल्याने गौरीला अश्रू अनावर
आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाल्यानंतर कोर्टाबाहेर गौरी खानला फोटोग्राफर्सने घेरले. गौरी तिच्या चेहऱ्यावर हाथ ठेवून रडताना दिसत होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी गौरीच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर कमेंट्स केल्या.
गौरीचा 51 वा वाढदिवस
आर्यनच्या जामीन अर्जावरील सुनावणीच्या दिवशी गौरीचा 51 वा वाढदिवस होता. अनेक बॉलिवूडमधील कलाकरांनी सोशल मीडियावर गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पोस्ट शेअर केली होती. एका रिपोर्टनुसार आर्यन अटकेत असल्याने या वर्षी गौरीने तिचा वाढदिवस साजरा केला नाही. त्यामुळे जर आर्यनला जामीन मिळाला असता तर ते गौरीला सर्वांत स्पेशल गिफ्ट मिळाले असते, असे अनेकांचे मत आहे.
'क्रुझवरील पार्टीतून दोघांना सोडलं! त्यातला एक भाजप नेत्याचा मेहुणा', नवाब मलिकांचा खळबळजनक आरोप
बॉलिवूड कलाकारांनी दिला शाहरूख खानला पाठिंबा
आर्यन खानच्या अटकेनंतर अनेक बॉलिवूड कलाकरांनी सोशल मीडियवर या ड्रग्स प्रकरणाबद्दल आपली मतं मांडली. बॉलिवूडमधील काही कलाकारांनी शाहरूखला पाठिंबा दिला आहे. पूजा भट, सुचित्रा कृष्णमूर्ति, सुनील शेट्टी आणि सलमान खान यांनी शाहरूखला पाठिंबा दिला आहे.
Drug Case: आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूड कलाकारांचा शाहरूखला पाठिंबा
आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोवाला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती, तर उर्वरित पाच इतर आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती.