Crime Web Series On Netflix: ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) नेटफ्लिक्सवर (Netflix) असलेली वेब सीरिज (Web Series) सत्य घटनेवर आधारित आहे. ही वेब सीरिज बनवण्यासाठी दिग्दर्शकाला तब्बल सहा महिने रिसर्च करावा लागला होता. त्यानंतर ही वेब सीरिज तयार झाली. याचाच परिणाम म्हणून की काय? वेब सीरिजनं रिलीज होताच ढिगभर अवॉर्ड्सवर आपलं नाव कोरलं होतं. 

Continues below advertisement


सध्या मनोरंजन आपल्या हातात आलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेक प्रकारच्या ड्रामा सीरिज रिलीज होत असतात. त्यापैकी अनेक टीकेच्या धनी होतात, तर अनेक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. अशातच नेटफ्लिक्सवर ही क्राईम-थ्रीलर सीरिज खूपच पॉप्युलर झाली आणि हिटही ठरली. ही क्राईम-थ्रिलर सीरिज आपल्या पटकथेसोबत, इतर अनेक बाबतींत एवढी सरस ठरली की, तिला 8.5 रेटिंग मिळालं आहे. एवढंच नाहीतर, अनेक इंटरनॅशनल अवॉर्डसही या सीरिजनं आपल्या नावे केले आहेत.  


आम्ही ज्या वेब सीरिजबाबत सांगत आहोत, ती म्हणजे, 2019 मध्ये पहिल्या सीझनसह प्रेक्षकांना आवडलेली वेब सीरिज दिल्ली क्राईम. या वेब सीरिजच्या पहिल्या सीझनला 48 व्या एमी अवॉर्ड्समध्ये बेस्ट ड्रामा सीरीजचा (Best Drama Series) अवॉर्ड मिळाला होता. 


दिग्दर्शिका रिची मेहता (Director Richie Mehta) यांची वेब सीरिज दिल्ली क्राईमच्या (Delhi Crime) पहिल्या सीझनमध्ये एकूण 7 एपिसोड्स होते आणि प्रत्येक एपिसोडनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं. दरम्यान, दिल्ली क्राईम देशभरात खळबळ माजवणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणावर आधारित होती. सत्य घटनेवर बनलेल्या या वेब सीरिजचं शुटिंग सुरू करण्यापूर्वी तब्बल सहा महिन्यांचा रिसर्च करण्यात आलेला. या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री शेफाली शाह दिसली आहे. शेफाली शाहनं सीरिजमध्ये डेप्युटी कमिश्नरची भूमिका निभावली आहे. डेप्युटी कमिश्नर वर्तिका चतुर्वेदीला निर्भया प्रकरणातील आरोपींना शोधण्याचं काम सोपवण्यात आलं होतं. सीरिजमध्ये शेफाली शाहसोबत राजेश तैलंग, अनुराग अरोडा, रसिका दुग्गल आणि आदिल हुसैन यांसारखे कलाकार दमदार भूमिकांमध्ये दिसले आहेत. 






IMDB कडून 8.5 रेटिंग 


आयएमडीबीवर दिल्ली क्राईम वेब सीरिजसाठी 8.5 एवढं शानदार रेटिंग देण्यात आलं होतं. या सीरिजनं एमी अवॉर्ड्समध्ये एकूण 26 अवॉर्ड्स आपल्या नावे केले होते. फिल्ममध्ये दाखवण्यात आलेल्या सत्य घटनांवर अनेक दिवस खूप रिसर्च करण्यात आला. हा रिसर्च करण्यासाठी दिग्दर्शकांना एकूण सहा महिने लागले. याव्यतिरिक्त सीरिजचं शुटिंगही दिल्लीतील लोकेशन्सवरही करण्यात आलेलं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Heyy Babyy Child Actress Juanna Sanghvi: 'हे बेबी' सिनेमातली चिमुकली आठवतेय? 18 वर्षांनी फोटो समोर; गालावरची खळी पाहून चाहते म्हणाले, 'डिक्टो प्रीति झिंटाची कॉपी'