Heyy Babyy Child Actress Juanna Sanghvi: 2007 मध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि फरदीन खान (Fardeen Khan) यांचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला, त्याचं नाव 'हे बेबी' (Heyy Babyy). 'हे बेबी' नावाच्या या चित्रपटानं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं. एकीकडे, या चित्रपटानं लोकांना खूप हसवलं आणि त्याच वेळी, अनेक ठिकाणी भावूकही केलं. साजिद खान दिग्दर्शित हा चित्रपट अमेरिकन चित्रपट 'थ्री मेन अँड अ बेबी' वर आधारित होता आणि हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. तीन मुख्य कलाकारांव्यतिरिक्त, चित्रपटात एक गोंडस लहान बाळ देखील होतं. या सिनेमात तगडी स्टारकास्ट असूनही त्या बाळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चित्रपटात क्युट बाळाचं नाव एंजल ठेवलं होतं. याच चिमुकल्या एंजलची भूमिका जुआना सांघवी हिनं साकारली होती. अशातच, आता चित्रपटाच्या 18 वर्षांनंतर, जुआनाचे फोटो इंटरनेटवर पुन्हा एकदा समोर आले आहेत, जे पाहून फॅन्स खूश झालेच आहेत, तर तिला पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची गळ घालत आहेत.
जुआनाच्या क्युटनेसनं चाहते घायाळ
जुआनानं 'हे बेबी' चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलीच, पण चित्रपटातील कलाकारांनीही तिला खूप प्रेम दिलं. जानेवारी 2022 मध्ये, फरदीन खाननं हे बेबी चित्रपटातील एक बीटीएस फोटो शेअर केला. ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं की, त्यानं लहान जुआनासोबत एक सीन शूट करण्यासाठी सिगारेट सोडली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, प्रेक्षक तसेच समीक्षक जुआनाच्या गोंडसपणानं प्रभावित झाले. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, एंजलनं चित्रपटातील तिन्ही स्टार्सची लाईमलाईट चोरलेली.
चाहते म्हणाले बॉलिवूडमध्ये वापसी कर
2024 मध्ये जुआनाच्या बर्थडे पार्टीचे फोटो व्हायरल झालेले. आता 'हे बेबी' सिनेमात दिसलेली ही चिमुकली 21 वर्षांची झाली आहे. फोटोंमध्ये तिला ओळखणंही कठीण झालं आहे. तसेच, नेटकऱ्यांनी जुआनाचे फोटो पाहून तिनं बॉलिवूडमध्ये कमबॅक करावं, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
