New Caller Tune: मोबाईलवरुन एखाद्याला फोन केला की आपल्याला अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येतो. मात्र आजपासून अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकू येणार नाही. कारण त्याजागी आता नवीन कॉलर ट्यून येणार आहे. कोरोना लसीकरणाला देशात सुरुवात होत असल्याने आता अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


देशातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा लसीकरण यशस्वी करण्यासाठी सज्ज झाली आहे. उद्यापासून देशात लसीकरण सुरू होणार आहे. त्यामुळे नव्या टप्प्यासाठी नवीन कॉलर ट्यून असणार आहे. ही कॉलर ट्यून लसीकरणाबाबत जनजागृती करणारी असणार आहे. नवीन कॉलर ट्यून ही महिलेच्या आवाजात असणार आहे. "नवीन वर्ष लसीच्या रूपाच नवीन आशा घेईन आले आहे. तसेच  वॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित आहे, अफवांवार विश्वास ठेवू नका", असा संदेश या कॉलरट्यूनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.


सुरुवातीला ही कॉलर ट्यून देशभरातील लोकांना हा साथीचा रोग टाळण्यासाठी आणि या आजाराशी लढाई टाळण्यासाठी संदेश देत होती. त्यानंतर ही कॉलर ट्यून अनलॉकच्या मेसेजमध्ये बदलली गेली. बरेच दिवस, लोक फोनवर अनलॉक प्रक्रियेचा मेसेज आणि कोरोनापासून बचाव असं ऐकत होते. त्यानंतर या कॉलर ट्युनद्वारे अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने कोरोनाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला होता. हे.अमिताभ बच्चन यांच्या आवाजात सध्या सुरु असलेली कोरोना कॉलर ट्यून हटवावी यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.


कॉलर ट्यूनमध्ये अमिताभ बच्चन काय म्हणत होते?


कॉलर ट्यूनमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, नमस्कार, हमारा देश और पूरा विश्व आज कोविड-19 की चुनौती का सामना कर रहा है. कोविड-19 अभी खत्म नहीं हुआ है, ऐसे में हमारा फर्ज है कि हम सतर्क रहें. इसलिए जब तक दवाई नहीं, तब तक कोई ढिलाई नहीं. कोरोना से बचाव के लिए जरूरी है, नियमित रूप हाथ धोना, मास्क पहनना और आपस में उचित दूरी बनाए रखना. याद रखिए दो गज दूरी, मास्क है जरूरी. खांसी बुखार या सांस लेने में कठिनाई होने पर हेल्पलाइन नंबर 1075 पर संपर्क करे.


संबंधित बातम्या :



अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलरट्यून हटवण्याची मागणी, दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल