मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा सेलिब्रिटी बऱ्याच मुद्द्यांवर व्यक्त होत असतात. पण, अनेकदा हे व्यक्त होणं त्यांना महागातही पडताना दिसतं. सध्या अशीच परिस्थिती उभी ठाकली आहे, अभिनेता करण वाही याच्यासमोर. कुंभ मेळ्यामध्ये साधूंची झालेली गर्दी पाहून त्यावर करणनं प्रश्नचिन्हं उपस्थित केलं. ज्यानंतर त्याला अनेकांच्याच टीकेचा धनी व्हावं लागलं. 


सध्या सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्यासंदर्भातील अनेक वृत्त मागील काही दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. त्यातच आता चर्चा सुरु झाली आहे, ती म्हणजे मोठ्या संख्येनं जमलेल्या साधुंमुळं वाढलेल्या कोरोना संक्रमणाच्या धोक्याची. करणनं यावरच भाष्य करणारं त्याचं मत इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून शेअर केलं. 


'नागा साधू बाबांसाठी वर्क फ्रॉम होम, अशी काही संकल्पना नाही का? म्हणजे गंगेतून पाणी आणत घरीत त्यातून स्नान करणं वगैरे असं काहीतरी.... ', अशी कमेट करत आपल्याला पडेलेला कुतूहलपूर्ण प्रश्न त्यानं मांडला. पण, त्याची ही प्रश्न विचारण्याची पद्धत मात्र अनेकांनाच खटकली. ज्यानंतर नेटकऱ्यांनी करणवर जोरदार टीकेचा मारा केला. 



कुंभ मेळ्यातील नागा साधूंविषयी कमेंट पडली महागात; अभिनेता करण वाही याला जीवे मारण्याची धमकी


हिंदू विरोधी मत असल्याचं म्हणत त्याच्यावर अनेकांनी तोफ डागली, तर काहींनी त्याला तू भगवद्गीता वाचली आहेस का, असा प्रश्नही विचारला. करणच्या या पोस्टवर टीका आल्याच. सोबतच त्याला जीवे मारण्याची धमकीदी देण्यात आली. ज्याबाबतची माहिती त्यानं इन्स्टा पोस्टच्या माध्यमातून दिली. 


COVID-19 vaccine Sputnik V: काही दिवसांतच भारताला मिळणार रशियाची स्पुटनिक V लस 


'तर..., मला अनेक संदेश, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकीही येण्यास सुरुवात झाली आहे. खूप छान भारतीय नागरिकांनो. जर हिंदू असणं म्हणजे कोविडच्या नियमांचं उल्लंघ करणं हेच आहे, तर मग तुम्ही पहिलं हिंदू म्हणजे काय, हे वाचून घ्या', अशा शब्दांत करणनं त्याचा संताप व्यक्त केला. 


लाखोंच्या संख्येनं साधू हरिद्वारमध्ये एकवटले... 


उत्तराखंडमधील हरिद्वार येथे सुरु असणाऱ्या महाकुंभ मेळ्यामध्ये लाखोच्या संख्येनं साधू एकवटले. विविध आखाड्यातील साधूंनी ब्रह्म कुंड आणि हर की पौडी येथे गंगा घाटावर जाऊन शाही स्नानामध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं होतं.