Comedian Pranit More Assaulted: सोलापूर : स्टँडअप कॉमेडियन (Standup Comedian) प्रणित मोरेला (Pranit More) सोलापुरात (Solapur) मारहाण करण्यात आली. सोलापुरातील एका कार्यक्रमात स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहाडियावर (Veer Paharia) जोक केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटानं हल्ला केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं आपल्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर पोस्ट करुन दिली. तसेच, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याची माहितीही प्रणित मोरेनं आपल्या पोस्टमधून दिली होती. अशातच आता याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून 10 ते 12 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी बुधवारी माध्यमांना याप्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणात 10 ते 12 जणांना ताब्यात घेतलं असून याप्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू, अभिनेता वीर पहाडिया याला लक्ष्य करून स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांनं सोलापुरातील एका कार्यक्रमात जोक केला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक गट नाराज झाला. त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. या बाबतीत कॉमेडीयन प्रणित मोरे यानं इंस्टाग्रामवरून पोस्ट करतं माहिती दिली होती, तर वीर पहाडियानं देखील दिलगिरी व्यक्त केली होती.
प्रणित मोरे मारहाण प्रकरणात कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल?
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपी तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य 10-12 साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 189(2), 190, 191(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोलापूर पोलिसांनी प्रणित मोरेला जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं गेलं, पण ते आले नाहीत. तसेच, पोलिसांनी प्रणित मोरेचा शो ज्या सोलापुरातील हॉटेलमध्ये झाला, त्या हॉटेल मालकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :