मुंबई : सोनी टीव्हीवर येणारा सीआयडी कार्यक्रम अनेकांच्या आवडीचा होता. जवळपास दोन दशके या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. या कार्यक्रमातील पात्रही लोकांच्या ओळखीची बनली होती. म्हणून अनेकदा लोकांना या कलाकारांचं खरं नाव माहिती नसे मात्र कार्यक्रमातील नाव तोंडपाठ होतं. या कार्यकमातील असंच एक पात्र होतं 'इन्स्पेक्टर दया' म्हणजेच दयानंद शेट्टी जो दरवाजा तोडण्यासाठी प्रसिद्ध होता. याशिवाय एसीपी प्रद्द्युमन यांचा 'कुछ तो गडबड है दया' हा डायलॉगही प्रसिद्ध झाला होता.
'सीआयडी' चे दयानंद शेट्टी गेल्या दोन दशकांपासून कार्यक्रमाशी संबंधित आहे. या कार्यक्रमामुळे दया प्रत्येक घराघरात पोहोचला. मात्र लोकांना या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त माहिती नसते. दया उर्फ दयानंद शेट्टी अभिनेता होण्यापूर्वी एक खेळाडू होता. तो 1994 मध्ये महाराष्ट्रातून डिस्कस थ्रोचा चॅम्पियन होता.
या गेममध्ये चॅम्पियन झाल्यानंतर दयाने सोनी चॅनलच्या 'सीआयडी' कार्यक्रमासाठी ऑडिशन दिले. ज्यामध्ये त्याला 'इन्स्पेक्टर दया' च्या भूमिकेसाठी निवडले गेले. शोबरोबरच शोची सर्व पात्रेही चाहत्यांमध्ये सुपरहिट ठरली. या कार्यक्रमा संबंधित प्रत्येक कलाकाराने आपल्या कारकिर्दीत उंची पाहिली आहे.
दयानंद शेट्टीच्या फीसबद्दल सांगायचं तर, एका दिवसाच्या शुटिंगसाठी दया एक लाख रुपये घेते, असे सूत्रांकडून समजले आहे. म्हणजेच जर दया दररोज 'सीआयडी'चं शूटिंग करत असेल तर त्यांची महिन्याची कमाई 30 लाख रुपये आहे. 'सीआयडी' शिवाय दयानंद शेट्टीने बॉलिवूडमधील बर्याच चित्रपटांमध्येही काम केलं. यामध्ये 'सिंघम रिटर्न्स', 'जॉनी गद्दार' आणि 'रनवे' या सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.