Mission Impossible, Tom Cruise : हॉलिवूडच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ (Mission Impossible) या चित्रपटाने प्रेक्षकांचे हृदयावर राज्य केलं आहे. या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग जगभरात पसरलेला आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता टॉम क्रुझ (Tom Cruise) यानेही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मात्र, आता अभिनेता टॉम क्रुझ हा चित्रपट सोडणार असल्याची चर्चा हॉलिवूडसह जगभरात रंगली आहे. या एका चर्चेने चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे. मात्र, आता यावर या चित्रपटाचे निर्माते-दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅक्वेरी (Christopher McQuarrie) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
टॉम क्रुझ 'मिशन: इम्पॉसिबल' ही चित्रपट मालिका सातव्या किंवा आठव्या भागानंतर सोडत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र, आता यावर दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅक्वेरीने प्रतिक्रिया दिली आहे. 'लाईट द फ्यूज पॉडकास्ट'मध्ये दिग्दर्शकाने सांगितले की, ‘प्रेक्षकांनी आणि चाहत्यांनी जे ऐकले आहे, त्यावर विश्वास ठेवू नये.’ 'मिशन: इम्पॉसिबल' चे दिग्दर्शक क्रिस्टोफर मॅक्वेरी यांनी टॉम क्रूझशी संबंधित या चर्चांना केवळ अफवा म्हटले आहे.
काय म्हणाले क्रिस्टोफर मॅक्वेरी?
नुकत्याच एका मुलाखतीत क्रिस्टोफर मॅक्वेरीला ‘मिशन इम्पॉसिबल डेड रेकनिंग पार्ट 7’ या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. टॉम क्रूझचा या चित्रपटासोबतचा प्रवास संपला आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना क्रिस्टोफर मॅक्वेरी म्हणाले की, ‘आम्ही गेल्या 15 वर्षांपासून टॉम क्रूझसोबत काम करत आहोत. जेव्हा आम्ही काही कामानिमित्त किंवा एखाद्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी भेटतो, त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनेक मीडिया रिपोर्ट समोर येतात. मात्र, हे सर्व अहवाल खरे असतीलच असे नाही. मिशन इम्पॉसिबलच्या 7 आणि 8 भागांनंतरही आम्ही टॉम क्रूझसोबत काम करणार आहोत.’ लवकरच हे दोघे आणखी एका चित्रपटात एकत्र काम करणार आहेत, जो ‘मिशन इम्पॉसिबल’पेक्षा अधिक थ्रिलर आणि सस्पेन्सने भरलेला असेल.
जगातील सर्वात महागडा अभिनेता!
टॉम क्रूझ हा जगातील सर्वात महागडा अभिनेता आहे. काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘टॉप गन मॅव्हरिक’ या चित्रपटासाठी त्याने सुमारे 798.6 कोटी रुपये मानधन घेतले होते. टॉम क्रूझच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्याचा ‘टॉप गन मॅव्हरिक’ हा चित्रपट यावर्षी 27 मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे बजेट 1357.85 कोटी रुपये असल्याचे म्हटले गेले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 1012 कोटींची कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने 9927 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
हेही वाचा :