Choreographer Shiva Shankar dies : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कोरिओग्राफर शिवा शंकर (Shiva Shankar) यांचे हैद्राबादमधील हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी तसेच चित्रपट निर्मात्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शिवा शंकर यांना श्रद्धांजली वाहिली.
कोरोना झाल्यामुळे शिवा शंकर यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. पीटिआयच्या रिपोर्टनुसार, त्याचा मोठा मुलगाही व्हायरल इन्फेक्शनवर उपचार घेत आहे. सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहीले, 'मास्टर गुरू शिवा शंकर यांच्या निधनाबद्दल कळाल्यावर खूप दु:ख झाले, त्यांचा वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला पण देवाच्या मनात काही तरी वेगळे होती. मास्टरजी तुमची नेहमी आठवण येईल.'
प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीही ट्विट केले, 'मास्टर गुरू शिवा शंकर यांच्या आत्म्याला शांती लाभो. मगधीरा या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली होती.' शिवा शंकर यांनी थाना सेर्धा कूट्टम आणि सरकार यांसारख्या तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्येही काम केले.