Choreographer Geeta Kapur Quits Bollywood: प्रसिद्ध कोरिओग्राफर गीता कपूर (Choreographer Geeta Kapoor) म्हणजेच, चाहत्यांची लाडकी गीता माँ हिनं बॉलिवूडला अलविदा म्हटलं आहे. तिनं स्वतःच एका मुलाखतीत बोलताना याचं कारण सांगितलं आहे. गीता कपूरनं बॉलिवूडमधल्या तिच्या कारकिर्दीची सुरुवात असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून केलेली. त्यासोबतच गीतानं बॉलिवूडमधले गाजलेले चित्रपट 'कुछ कुछ होता है' आणि 'दिल तो पागल है' सारख्या चित्रपटांच्या गाण्यांमध्ये फराह खानला असिस्ट केलेलं. गेल्या अनेक वर्षांपासून गीता कपूर टेलिव्हिजन डान्स रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून उपस्थित असायची. पण, आता तिनं थेट माझा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचा कोणताही विचार नाही, असं म्हटलं आहे.
नुकतीच गीता कपूरनं 'हिंदी रश'ला मुलाखत दिली. गीता कपूरला या मुलाखतीत विचारण्यात आलं की, तू बॉलिवूडमध्ये कमबॅक कधी करणार? बरेच दिवस झाले आणि आता तुझा पुरेसा ब्रेकही झालाय, आता परत ये... तर यावर बोलताना गीता कपूर म्हणाली की, "नाही मला वाटतंय की, प्रत्येकानं एक पाऊल मागे हटलं पाहिजे आणि नव्या प्रतिभेला पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे..."
गीता माँनं सांगितलं बॉलिवूड सोडण्याचं कारण
गीता माँ पुढे म्हणाली की, "आता दुसऱ्यांनी पुढे जाण्याची आणि स्वतःचं नाव कमावण्याची वेळ आलीय. आम्हाला जेवढं या इंडस्ट्रीनं द्यायचं होतं आणइ जेवढं काम, पैसे आणि नाव द्यायचं होतं, आशीर्वाद द्यायचे होते, मला वाटतं ते सर्व मला मिळालं आहे. पण जर असं काही झालं की, माझी अतीव इच्छा असेल आणि मला ती संधी माझ्या हातून सोडायची नसेल, तर कदाचित ते काम मी करेल..."
इंडस्ट्रीत कामाची खूपच कमतरताय...
गीता कपूर पुढे बोलताना म्हणाली की, "सध्या इंडस्ट्रीत कामाची कमतरता आहे आणि अशा परिस्थितीत इतर लोकांना संधी दिली पाहिजे. आजकाल, ते चित्रपट बनत नाहीत, जसे आमच्या काळात बनवले जात होते... जिथे 8-10 गाणी असायची. मोठी गाणी असायची. डान्स असलेली गाणी असायची. त्यामुळे एवढ्या कमी कामात आपण झडप घालायची आणि इतरांना काम करण्याची संधीही नाही द्यायची... त्यामुळे इतरांना संधी द्या. मी जिथे आहे, तिथेच खूश आहे."
गीता कपूरनं पुढे सांगितलं की, "तिला कोणत्याही बंधनात काम करायचे नाही. तिला कॉपी-पेस्ट नाही तर सर्जनशील काम करायचे आहे. गीता कपूरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिने वयाच्या 17 व्या वर्षी सुरुवात केली. त्यानंतर ती फराह खानच्या ग्रुपमध्ये सामील झाली."
दरम्यान, गीता कपूरच्या इंडस्ट्रीतल्या कामाबाबत बोलायचं झालं तर, तिनं फराह खानला अनेक प्रोजेक्ट्समध्ये असिस्ट केलं होतं. ज्यामध्ये, 'कुछ कुछ होता है', 'दिल तो पागल है' याव्यतिरिक्त 'कभी खुशी कभी गम', 'मोहब्बतें', 'कल हो ना हो', 'मैं हूं ना' आणि 'ओम शांति ओम' यांसारख्या नावांचा समावेश आहे. गीता कपूर, फराह खानला आईचा दर्जा देते आणि तिलाच आपलं गुरूही मानते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :