Choreographer Ganesh Acharya On Bollywood: दाक्षिणात्य सुपरस्टार (Southern Superstar) अल्लू अर्जुनचा 'पुष्पा' (Pushpa) आणि 'पुष्पा'चा सीक्वल 'पुष्पा 2'नं (Pushpa 2) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुरळा उडवला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. चित्रपटाची पटकथा, स्टारकास्ट, कॅरेक्टर्स आणि सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) धमाकेदार डान्स, साऱ्या गोष्टींचं कौतुक झालं. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाबद्दल बोलायचं झालं तर, 'ऊ अंटाव' चित्रपटातील आयटम साँग खूप गाजलं. प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यात समंथा रूथ प्रभूनं परफॉर्म केलं होतं.

प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य (Famous Choreographer Ganesh Acharya) यांनी बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. त्यांनी साऊथच्या 'पुष्पा': द राईज', 'केजीएफ', 'देवरा', 'गेम चेंजर' आणि 'पुष्पा: द रुल' या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधील सुपरहिट गाण्यांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिलं आहे. काही काळापूर्वी त्यांनी साऊथ इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटात काम केल्याचा अनुभवही शेअर केला आहे. 

बॉलिवूड स्टार्सनी कधीच कौतुक केलं नाही

कोरिओग्राफर गणेश आचार्य म्हणाले की, 'पुष्पा' च्या गाण्यांवर काम करून, अल्लू अर्जुनला डान्स शिकवून ते परत आले, तेव्हा 5 दिवसांनी अल्लू अर्जुनने स्वतः त्यांना फोन केला. अल्लू अर्जुननं फोन करून गणेश आचार्यांनी केलेल्या कोरिओग्राफीचं कौतुक केलं. पुढे बोलताना गणेश आचार्य म्हणाले की, अल्लू अर्जुन व्यतिरिक्त इतर कोणत्याही बॉलिवूड स्टारनं त्यांना बोलावून कधीच त्यांचं कौतुक केलेलं नाही. गणेश आचार्य यांनी सांगितलं की, त्यांना 'पुष्पा'च्या सक्सेस पार्टीसाठीही आमंत्रित करण्यात आलं होतं.

बॉलिवूडसारखी नाही... वेगळ्या प्रकारची होती सक्सेस पार्टी 

पॉडकास्टमध्ये बोलताना गणेश आचार्य यांनी 'पुष्पा'च्या सक्सेस पार्टीबाबत खुलासा केला. त्यांनी सांगितलं की, त्यांना हैदराबादला सक्सेस पार्टीसाठी बोलावलं गेलं होतं. त्यावेळी त्यांना वाटलं की, खाणं-पिणं, नाच-गाणं असेल. पण, ज्यावेळी ते हैदराबादला पोहोचले, त्यावेळी गोष्टी फारच वेगळ्या असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले की, तिथे एक स्टेज होता, जिथे फिल्मसाठी काम केलेल्या टीममधले कॅमेरामन, लाईटमन्सना अवॉर्ड्स दिले जात होते. गणेश आचार्य म्हणाले की, या गोष्टी बॉलिवूडमध्ये कधीच होत नाहीत. मी बॉलिवूडबाबत वाईट बोलत नाहीये, फक्त इथे काही घाण आहे, जी साफ करणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jaya Bachchan Gets Angry Due To This Disease: जया बच्चन यांना 'हा' आजार झालाय, म्हणून त्या सारख्या चिडतात; श्वेता-अभिषेकचा खळबळजनक खुलासा