Jaya Bachchan Gets Angry Due To This Disease: बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) आपल्या चिडचिड्या स्वभावामुळे आणि परखड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये त्या नेहमीच पॅपाराझी, माध्यमांवर चिडचिड करताना दिसून येतात. पण, जया बच्चन अशा चिडचिड का करतात? त्या नेहमीच माध्यमांवर खेकसताना किंवा आरडाओरडा करताना का दिसतात? तर यामागे एक कारण आहे. त्यांना एक आजार आहे आणि हाच आजार त्यांच्या चिडचिड्या स्वभागावचं कारणं आहे, असं त्यांची मुलगी श्वेता नंदा हिनं सांगितलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी 'गुड्डी' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. यानंतर त्यांनी शोले, बावर्ची, अभिमान, दिल दीवाना, कोरा कागज, सिलसिला, कभी खुशी कभी गम अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
अमिताभ बच्चन देखील जया बच्चन यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या भाषणांचीही खूप चर्चा होते, पण सर्वात जास्त म्हणजे, माध्यमांवर रागावतानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. येता-जाता माध्यमांवर चिडचिड करणं, आरडाओरडा करतानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. जया बच्चन जेव्हा जेव्हा कोणत्याही इव्हेंटला जातात किंवा कोणाच्या घरी जातात, तेव्हा त्या माध्यमांपासून अंतर राखूनच वागतात. एवढंच नाही तर, जया बच्चन जेव्हा जेव्हा पार्ट्यांमध्ये दिसतात, तेव्हा त्या अनेकदा पॅपाराझींवर रागावताना दिसतात. हे फक्त एकदाच लक्षात आलेलं नाही, तर त्यांचे व्हिडीओ अनेक वेळा व्हायरल झाले आहेत. जिथे जया बच्चन पॅपाराझींवर संतापताना दिसल्या. त्यांचं वागणं पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं. या अशा चिडचिड का करतात? असाच प्रश्न सर्वांना पडतो.
जया बच्चन यांच्या चिडचिडी मागचं कारण नेमकं काय?
जया बच्चन यांच्या चिडचिडीमागचं रहस्य त्यांची मुलगी श्वेता नंदा हिनं सर्वांना सांगून टाकलं आहे. गर्दी पाहून जया बच्चन का रागावतात? हे श्वेता बच्चननं सांगून टाकलं आहे. कॉफी विथ करण या शोमध्ये श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन आले होते. यावेळी बोलताना दोघांनी आई जया हिच्या सतत रागावण्याचं आणि चिडण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे. श्वेता म्हणाली की, आईला एक आजार आहे, ज्यामुळे ती मीडिया, गर्दी आणि कॅमेरे पाहून असं वागत असल्याचं सांगते.
श्वेता नंदानं पुढे बोलताना सांगितलं की, जया बच्चनला क्लॉस्ट्रोफोबिया नावाचा आजार आहे. हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे, ज्यामुळे गर्दी पाहून अचानक व्यक्ती अस्वस्थ होते. बऱ्याच प्रसंगी असंही घडतं की, ती व्यक्ती रागराग, चिडचिड करते किंवा ती बेशुद्ध पडू शकते. ती खूप गर्दीच्या ठिकाणी असते, तेव्हा हे करते. या आजारानं ग्रस्त असलेल्या व्यक्तीसोबत हे बाजारात, लिफ्टमध्येही घडू शकतं.
जया बच्चन यांना 'या' गोष्टी आवडत नाहीत
श्वेता बच्चन यांनी सांगितलं की, तिच्या आईला कोणी गर्दीच्या ठिकाणी घेऊन गेलं किंवा कोणी तिला स्पर्श करण्याचा विचार केला तर, तिला ते अजिबात आवडत नाही. जेव्हा कॅमेराचा फ्लॅश तिच्या डोळ्यावर पडतो, त्यावेळी ती अस्वस्थ होते. ती कुठे बाहेर गेली, तरी मीडिया तिच्या मागे लागतो, हे तिला अजिबात आवडत नाही.
खरंतर, एकदा जया बच्चन करण जोहरची आई हिरू जोहरच्या वाढदिवसाला उपस्थित राहण्यासाठी गेल्या होत्या, तेव्हा एका पॅपाराझीनं जया बच्चन यांचा फोटो काढला, ते पाहून जया बच्चन पॅपाराझीवर खूप रागावल्या आणि त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी त्याला थेट जाब विचारला. मला न विचारता मोबाईलनं माझा फोटो कसा काढला? असा जाब जया बच्चन यांनी विचारला. जया बच्चन यांनी कित्येकदा पॅपाराझींना फटकारलं आहे. त्यानंतर पॅपाराझी तिथून निघून गेल्याचंही पाहायला मिळालं आहे. पण, तरीही जया बच्चन मात्र तिथेच उभ्या राहून पॅपाराझींचा समाचार घेत असल्याचंही पाहायला मिळालं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
