Chiranjeevi : प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती सर्वांना दिली.
चिरंजीवी यांनी पोस्टमध्ये लिहिले, 'सर्व नियमांचे पालन करूनही मला कोरोनाची लागण झाली आहे. सौम्य लक्षण जाणवल्यानंतर मी काल रात्री कोरोनाची चाचणी केली. तेव्हा कळालं की मला कोरोनाची लागण झाली आहे. मी घरीच क्वारंटाईन झालो आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची चाचणी करून घ्यावी ही विनंती.'
काही दिवसांपूर्वी चिरंजीवी यांनी त्यांच्या कुटुंबासोबत म्हणजेच राम चरण, वरुण तेज, साई धरम तेज, नागा बाबू यांच्या सोबत संक्रांत साजरी केली. चिरंजीवी यांचे चार नवे प्रेजेक्ट्स लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. चिरंजीवी यांचा आचार्या हा आगामी चित्रपट 1 एप्रिल 2022 रोजी रिलीज होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन कोरटाळा शीवयांनी केले आहे. चिरंजीवी यांच्यासोबतच राम चरण, काजल अग्रवाल आणि पूजा हेगडे यांनी देखील आचार्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मेहर रमेश दिग्दर्शित भोला शंकर तसेच कीर्ती सुरेश, जयराम मोहनराजा दिग्दर्शित गॉडफादर आणि बॉबी दिग्दर्शित मेगा 154 हे चित्रपट चिरंजीवी यांचे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
हे देखील वाचा-
Republic Day 2022 : बॉलिवूडकरांनी दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा; शेअर केली पोस्ट