Chinmayee Sumeet Slam Kangana Ranaut On Gen Z Statement: 'जेन-झीं'ना (Gen-Z) 'जनरेशन गटार' म्हटल्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि भाजप खासदार (BJP MP) कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या टीकेची धनी झालीय. तिच्यावर चोहीकडून टीकेची झोड उठली आहे. कंगना रनौत फक्त एवढंच बोलून थांबली नाहीतर, तिनं इतरही अनेक आक्षेपार्ह्य वक्तव्य केलीत. कंगनानं त्यासोबतच हिंदू तरुणींवर वादग्रस्त वक्तव्य केलंय. गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश करणाऱ्या, ड्रग्ज-दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या असं म्हणत कंगनानं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. आता कंगना रनौतच्या वक्तव्यावर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जातोय. अशातच आता मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित (Marathi Actress Chinmayee Sumeet) हिनं कंगना रनौतवर टीकास्त्र डागलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना चिन्मयी सुमित (Chinmayee Sumeet) हिनं कंगनावर तिखट आणि स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

कंगना रनौतनं वादग्रस्त वक्तव्य (Kangana Ranaut Controversial Statement) केलंय, या वाक्यालाच अर्थ नाही, कारण, त्या जेव्हा वक्तव्य करतात, ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात, असं म्हणत चिन्मयी सुमितनं कंगना रनौतवर टीका केली आहे. 

मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित काय म्हणाली? (Marathi Actress Chinmayee Sumeet On Kangana Ranaut)

Continues below advertisement

मराठी अभिनेत्री चिन्मयी सुमित म्हणाली की, "कंगना रनौत अत्यंत अभ्यासू वक्त्या आहेत... अभ्यास केल्याशिवाय त्या कधीच काही बोलत नाहीत, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं, या वाक्यालाच काहीच अर्थ नाही... त्या जेव्हा वक्तव्य करतात, ती वादग्रस्तच असतात किंवा वाद व्हावा म्हणूनच त्या बहुदा बोलतात... त्यामुळे छान आहे, त्यांनी जे म्हटलंय ते अगदी योग्यच असणार... कारण त्या त्यावेळेस संसदेच्या खिडकीतून बघत असणार की, कोण आलेत समोर...? त्यांनीच असं म्हटलं होतं की, पोलिसांचं कौतुक केलं होतं. जर ही मुलं आत आली असती तर त्यांनी काय केलं असतं माहीत नाही. आता त्यांनी कुठून बघितलं की, विद्यार्थी होते की, नव्हते हे मला खरंच कळत नाहीये... पण जर त्या म्हणतायत तर त्यांना कोणतीतरी आंतरिक शक्ती मिळाली असेल, ज्यामुळे त्यांना माहीत आहे की, ते विद्यार्थी कोण आहेत. किंवा आंदोलनात विद्यार्थी नाहीच आहेत, हे त्यांना माहीत आहे. त्या अगाध आहेत, मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो..."

पुढे बोलताना चिन्मयी समित म्हणाली की, "हे मी अत्यंत मनापासून सांगतेय की, त्या उत्तम अभिनेत्री आहेत. 'क्वीन'मध्ये त्या खूप आवडल्या होत्या. आणि आता त्यांनी ही जी भूमिका करायला घेतली आहे, त्यातसुद्धा त्या आपले शंभर टक्के देत आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं जे काही सुरू आहे की, सतत काहीतरी निरर्थक आणि बेसलेस गोष्टी बोलत राहायच्या तर ते त्या करत आहेत. ते त्यांचं 100 टक्के प्रेमानं आणि सचोटीनं करत आहेत. आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं. पण मी माझ्या डोळ्यांनी जे बघितलं त्यात मला 80 टक्के मुलं दिसली. 20 टक्के आमच्यासारखे लोक जे त्यांना पाठिंबा द्यायला गेले होते, असे लोक मी तरी बघितले."

...त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही : चिन्मयी सुमित (Chinmayee Sumeet On Kangana Ranaut)

"आतासुद्धा मुलांच्या भाषेबद्दल बोललं जात आहे, ती भाषासुद्धा 20 टक्के मुलांनी बोललेली मुलांची भाषा होती. माझ्यासोबत जी मुलं होती, ते ज्या घोषणा देत होते, त्यांच्या हातात ज्या पाट्या होत्या त्या मी बघत होते. त्यात निश्चित ते नव्हते... आता जर मी असं म्हणायचं ठरवलं की, माझ्या दोन मुलांकडे बघून मी त्या मानानं अंदाज लावते आणि मी म्हणते की, कोणी शिव्याच दिल्या नाहीत, तर ते जितकं खोटं होईल तितकं ह्या बाई बोलत आहेत... त्यांच्यावर विश्वास ठेवावा असं मला वाटत नाही...", असं चिन्मयी सुमित म्हणाली. 

"बेरोजगारी वाढवायची, मुलांना नोकऱ्या मिळू द्यायच्या नाहीत, त्यानंतर त्यांना झुरळं म्हणायचं आणि त्यांचा आत्मसन्मान दुखवायचा, हे करतायत... आता 'जनरेशन गटार' म्हणून अपमानावर तुम्ही अपमान करताय... दलदलीत एकदा पाय गोवला, की तो आत-आत जात जातो... असंच त्यांचं झालंय सगळ्यांचं... त्यामुळे जितकी ते घाण माजवतील, तितकेच ते गाळात रुतत जातील, एवढंच मी आता म्हणू शकते...", असं चिन्मयी सुमित म्हणाली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kangana Ranaut On CJP Saurav Das: दिल्लीच्या आंदोलनाचा हिरो सौरव दासला कंगना तोंडाला येईल ते बोलली, 'हा विद्यार्थी? बेकार, बेरोजगार... याच्या वयात माझ्याकडे दोन राष्ट्रीय पुरस्कार...'