Marathi Actor Blessed with Baby Boy: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ' छावा ' चित्रपटात अंताजी या पात्राची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा मराठमोळा अभिनेता आशिष पाथोडे (Ashish Pathode) सध्या वैयक्तिक आयुष्यात बाबाच्या भूमिकेसाठी सज्ज झालाय. अलीकडेच आशिषने चाहत्यांना गुड न्यूज शेअर करत तो बाबा झाल्याचं सांगितलं. अभिनेत्याच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. या संदर्भात एक खास पोस्ट शेअर करत त्याने मुलगा झाल्याचं चाहत्यांना सांगितलं. त्याच्या या पोस्टवर त्याच्याजवळची मंडळी, चाहते मित्र परिवार शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. (Marathi Actor)
नव्या आयुष्याचा गोड अध्याय
छावा चित्रपटामध्ये अभिनेता आशिष पाथोडेन अंताजीची भूमिका साकारली होती. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता आशिष बाबा झालाय. त्याच्या पोस्टवर मनोरंजन सृष्टीतील अनेक जण शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. आशिष पाथोडे आणि त्याची पत्नी प्रियांका टोके 16 फेब्रुवारी 2020 ला लग्न केलं होतं. लग्नानंतर पाच वर्षांनी आशिष आणि प्रियंका आई बाबा झाले आहेत. हनुमान जयंती दिवशी म्हणजेच 2 एप्रिल 2026 रोजी दोघांनीही त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. ही बातमी चहात्यांना देताना त्याने पोस्टवर लिहिलं ' आमचा हात धरण्यासाठी एक इवलासा हात, त्याचं प्रेम सोन्यासारखं अनमोल. देवानं दिलेली ही एक अमूल्य भेट. आमचं हृदय प्रेमानं ओतप्रोत भरला आहे. मुलगा झाला. ' असं म्हणत आशिषने आनंद व्यक्त केला. दोघांनीही आपल्या नव्या आयुष्याचा गोड अध्याय सुरु केलाय. दोघांनाही चाहत्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत .
आशिष पाथोडे याने अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. छावा चित्रपटात त्याने अंताजीची भूमिका साकारली होती. शिवाय ठाकरे या सिनेमात जावेद मियादादची भूमिका त्याने साकारली. तान्हाजी, हाउसफुल थ्री, मिमि, आदीपुरुष, सालार, सॅम बहादूर, यासारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत. याशिवाय क्राइम पेट्रोल, का रे दुरावा सारख्या मालिकांमध्ये ही तो दिसला.
