Chhaava Box Office Collection Day 52: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) ब्लॉकबस्टर चित्रपट 'छावा' (Chhaava Movie) रिलीज होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला, तरीसुद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिस (Box Office Collection) गाजवतोय. एकीकडे 'छावा' बॉक्स ऑफिसवर राज्य करतोय, तर दुसरीकडे एकामागून एक रेकॉर्ड्सचा चक्काचूर करतोय. या चित्रपटानं थिएटरमध्ये 50 दिवस पूर्ण केले आहेत. तरीसुद्धा 'छावा'ची घौडदौड सुरूच आहे.
बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवरची 'छावा'ची घौडदौड संथ होईल, असं बोललं जात होतं. पण, असं काहीच झालेलं नाही. अजूनही 'छावा' बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहे. अशातच जाणून घेऊयात, चित्रपटानं 52व्या दिवशी किती कमाई केली? तसेच, या चित्रपटाचं एकूण कलेक्शन किती? यासंदर्भात सविस्तर...
'छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?
बॉक्स ऑफिसवरच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 'छावा'नं हिंदी आणि तेलुगूमध्ये सात आठवड्यांत 609.87 कोटी रुपये कमावले आहेत. तेलुगू आवृत्तीची कमाई फक्त तीन आठवड्यांपासूनचीच आहे. कारण 'छावा' हिंदीमध्ये रिलीज झाल्यानंतर तब्बल चार आठवड्यांनी तेलुगुमध्ये रिलीज करण्यात आला.
50व्या आणि 51व्या दिवशी चित्रपटानं अनुक्रमे 55 लाख आणि 90 लाख रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच, कालपर्यंत चित्रपटानं 611.32 कोटी रुपये कमावले होते. आता जर 'छावा'च्या 52व्या दिवसाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तर, सकाळी 10.35 वाजेपर्यंत चित्रपटानं 1.30 लाखांची कमाई केली आहे आणि चित्रपटाची एकूण कमाई 612.62 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
'छावा'नं आज 10 मोठे विक्रम मोडीत काढलेत
'छावा'नं रिलीजच्या 52 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 चित्रपटांना मागे टाकले आहे. यापैकी काही चित्रपटांची आठव्या आठवड्यातील एकूण कमाई 'छावा'च्या आजच्या कमाईपेक्षा कमी आहे. 'छावा'नं कोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले?
- गदर 2 : 55 लाख (एकूण 8 व्या आठवड्याची कमाई)
- RRR : 80 लाख (आठव्या आठवड्यात हिंदी आवृत्तीची संपूर्ण कमाई)
- अॅनिमल : 20 लाख (52 व्या दिवसांची कमाई)
- जवान : 13 लाख (52 व्या दिवसाची कमाई)
- पुष्पा 2 : ४५ लाख (सर्व भाषांमधील 52 व्या दिवसाची कमाई)
- स्त्री 2 : 90 लाख (52 व्या दिवसाची कमाई)
- पठाण : 20 लाख (52 व्या दिवसाची कमाई)
- कल्की : 6 लाख (सर्व भाषांमधील 52 व्या दिवसाची कमाई)
- बाहुबली 2 : 1.4 कोटी (आठव्या आठवड्यात हिंदी कमाई, जी आठव्या आठवड्याच्या सुरुवातीच्या फक्त दोन दिवसांत 'छावा'नं मागे टाकली आहे)
- 2.0 : 3 लाख (आठ आठवड्यांची एकूण कमाई)
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा'चं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांमी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अक्षय खन्ना, डायना पेंटी, आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह हे देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत. चित्रपटाच्या बजेटबद्दल बोलायचं झालं तर, 'छावा' बनवण्यासाठी 130 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. अशातच चित्रपटानं त्याच्या एकूण बजेटच्या 368.58 टक्के नफा कमावला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :