Chhaava Box Office Collection Day 45: विक्की कौशल (Vicky Kaushal) स्टारर 'छावा'नं (Chhaava) आपली घौडदौड कायम ठेवली आहे. सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar) आला की, 'छावा' (Chhaava Movie) काहीसा फिका पडेल असं म्हटलं जात होतं. पण, असं काहीस घडलं नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यगाथेवर आधारित चित्रपटानं दबंग भाईजानच्या सिनेमावर मात केली आणि सर्वात मोठ्या ओपनरचा रेकॉर्ड कायम ठेवला. चित्रपट रिलीज होऊन दीड महिना उलटल्यानंतर 'छावा' प्रचंड नफा कमवत आहे.
'छावा' रिलीज होऊन 45 दिवस उलटले आहेत आणि 45 दिवसांनंतरही 'छावा' बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहे. जाणून घेऊयात 'छावा'नं आजपर्यंत किती कमाई केली?
45व्या दिवशी 'छावा'नं किती कमावले?
अधिकृत आकडेवारीनुसार, चित्रपटानं 5 आठवड्यांत 585.81 कोटी रुपये कमावले आणि सॅक्निल्कच्या आकडेवारीनुसार, सहाव्या आठवड्यात 16.3 कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे चित्रपटानं 602.11 कोटी रुपये कमावले. या कमाईमध्ये हिंदी आणि तेलुगू दोन्ही आवृत्त्यांचा सामावेश आहे.
चित्रपटानं 43 व्या दिवशी 1.15 कोटी रुपये कमावले आणि शनिवारी, म्हणजेच 44 व्या दिवशी, कमाईत वाढ झाली आणि कमाई 2 कोटी रुपयांवर पोहोचली. तर, 45व्या दिवशी, सकाळी 10:40 वाजेपर्यंत, चित्रपटानं 1.15 कोटी रुपये कमावले आहेत आणि चित्रपटाची एकूण कमाई 606.41 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.
'छावा'वर 'सिकंदर'चा कोणताही परिणाम नाही
विक्की कौशलच्या चित्रपटावर सलमान खानच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'सिकंदर'चा परिणाम होताना दिसत नाही, जो 10000 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झालाय. इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होऊनही, 'सिकंदर'नं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे.
'छावा'नं पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड मोडले
ज्या पद्धतीनं हा चित्रपट अजूनही कमाई करत आहे, त्यावरून असं दिसतं की, तो सातव्या रविवारी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील होऊ शकतो. जसं की, स्त्री 2 (2.5 कोटी), पुष्पा 2 (1.5 कोटी) आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइक (1.81 कोटी). दरम्यान, चित्रपटानं जवान (35 लाख), गदर 2 (70 लाख) आणि पठाण (81 लाख) या चित्रपटांनं सातव्या रविवारचा बॉक्स ऑफिस कलेक्शनचा रेकॉर्ड मोडला आहे.
दरम्यान, 'छावा'ला फक्त 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलं आहे. फिल्ममध्ये विक्की कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना आणि विनित कुमार सिंहसारख्या अॅक्टर्सनीही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. फिल्मचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकरांनी केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :