Sikandar Box Office Collection: बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'सिकंदर' (Sikandar Movie) रिलीज होण्यापूर्वीपासूनच चर्चेत होता. अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीवरुन असा अंदाज लावला जात होता की, 'सिकंदर' अगदी सहज 'छावा'ला (Chhaava Movie) पछाडेल. एवढंच काय तर 'छावा'चे सर्वच्या सर्व रेकॉर्ड 'सिकंदर' एका झटक्यात चक्काचूर करेल, असंही बोललं जात होतं. पण, असं झालं नाही. 2025 चा सर्वात मोठ्या ओपनरचा 'छावा'चा रेकॉर्ड 'सिकंदर' मोडणार होता, पण 'छावा' अगदी पुरून उरला. 

Continues below advertisement

भाईजानचा चित्रपट 'छावा' सोडा, पण स्वतःच्याच चित्रपटालाही मागे टाकू शकला नाही. सलमान खानचा 'सिकंदर' हा चित्रपट त्याच्या जुन्या 'टायगर 3' चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या 43 कोटी रुपयांच्या कलेक्शनलाही मागे टाकू शकला नाही, तसेच या वर्षी प्रदर्शित झालेल्या विक्की कौशल-रश्मिका मंदाना यांच्या 'छावा' या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनलाही मागे टाकू शकला नाही.

'सिकंदर' 'छावा'चा विक्रम मोडू शकला नाही

अधिकृत आकडेवारीनुसार, 'छावा'नं पहिल्या दिवशी 33.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. असं केल्यानं, हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा बॉलिवूडचा ओपनर ठरला आणि 'गेम चेंजर' (54 कोटी) नंतर दुसरा सर्वाधिक ओपनिंग करणारा भारतीय चित्रपट बनला. आता जर आपण सिकंदरच्या आकड्यांवर नजर टाकली तर आज सकाळी 10:30 वाजेपर्यंत चित्रपटानं फक्त 26 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. याचाच अर्थ हा चित्रपट 'छावा'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपेक्षा खूपच मागे पडला आहे.

Continues below advertisement

'सिकंदर' 'छावा'सारखे ब्लॉकबस्टर होतील का?

130 कोटींमध्ये बनलेला 'छावा' चित्रपटानं 45 दिवसांत सुमारे 600 कोटींची कमाई करून ब्लॉकबस्टर चित्रपट होण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा चित्रपट देशातील सर्वाधिक कमाई करणारा सातवा चित्रपट बनला आहे. 'सिकंदर'कडून अशी अपेक्षा होती की, हा चित्रपट 'छावा'चा लाईफटाईम कलेक्शनचा रेकॉर्ड मोडू शकेल, पण तसं झालं नाही.  अशातच 10 एप्रिल रोजी सनी देओलचा 'जाट' प्रदर्शित होण्यासाठी अजून 10 दिवस शिल्लक आहेत. कदाचित हा चित्रपट काही इतिहास घडवेल, अशी अपेक्षा आहे. 

दरम्यान, 'सिकंदर'चे जेवढे रिव्यू समोर आले आहेत, तेवढे रिव्यू कमकुवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. एबीपी न्यूजनं आपल्या रिव्यूमध्ये फिल्म कंटाळवाणी असल्याचं म्हटलं असून फक्त एकच स्टार दिला आहे. 'सिकंदर'चं दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केलंय. सलमान खानसोबत या चित्रपटात सत्यराज, रश्मिका मंदान्ना, प्रतीक बब्बर अशी तगडी स्टारकास्ट झळकली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Katrina Kaif Visited Pakistan: कतरिना कैफ गुपचूप पाकिस्तानला जाऊन आली, तिकडे कोणाला भेटली? लाहोरमधील 'तो' फोटो व्हायरल