Chhaava Box Office Collection Day 23: विक्की कौशल (Vicky Kaushal) - रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या 'छावा' (Chhaava Movie) या चित्रपटानं तीन आठवड्यांत अशी कामगिरी केली आहे, जी या वर्षी प्रदर्शित झालेल्या इतर कोणत्याही चित्रपटानं आतापर्यंत साध्य केलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पुत्र छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्यावर बनवलेल्या या चित्रपटानं 2025 मध्ये 500 कोटींचा टप्पा ओलांडणारा पहिला चित्रपट असल्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) ताबा असलेला 'छावा' (Chhaava) कोणते विक्रम मोडणार? कोणत्या दिग्गजांना मागे टाकणार? हे सविस्तर जाणून घेऊयात... 

'छावा' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन

अधिकृत आकडेवारीनुसार, 'छवा'ने पहिल्या आठवड्यात 225.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 186.18 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 84.94 कोटी कमावले आणि 22 व्या दिवशी 6.30 कोटी कमावले, ज्यामुळे एकूण 502.70 कोटी कमावले आहेत. 

चित्रपटाच्या आजच्या कमाईशी संबंधित सुरुवातीचे आकडे, म्हणजेच 23 व्या दिवशी, 'सॅकनिल्क'वर देखील आले आहेत, त्यानुसार चित्रपटानं आतापर्यंत 16.5 कोटी रुपये कमावले आहेत आणि एकूण कलेक्शन 519.2 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाचा हा चौथा आठवडा आहे. अशातच आता आलेल्या सुट्ट्यांमध्ये चित्रपटाची कमाई पुन्हा दुहेरी अंकावर पोहोचली आहे. दरम्यान, हे आकडे अंतिम नाहीत. यामध्ये बदल होऊ शकतात.

'छावा' कोणत्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार?

'छावा' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे, हे पाहता, विक्की कौशलचा हा चित्रपट पहिल्यांदाच 2023 मध्ये 525.7 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या 'गदर 2' चा विक्रम मोडेल असं दिसतं. यानंतर, जर चित्रपटानं चांगलं कलेक्शन केलं, तर हा चित्रपट शाहरुख खानच्या पठाणला लक्ष्य करेल, ज्यानं 2023 मध्ये 543.09 कोटी रुपये कमावले होते. याचा अर्थ असा की, शाहरुख खानच्या सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एकाचा विक्रम मोडण्यासाठी त्याला सुमारे 30 कोटी रुपये जास्त कमवावे लागतील.

दरम्यान, 'छावा' चित्रपट सुमारे 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विक्की कौशल संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे आणि रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात आशुतोष राणा आणि विनीत कुमार सिंह हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Movie Aurangzeb Akshaye Khanna: मांसाहार अन् दारुला शिवायचाही नाही, सतत हातात विणकामाच्या सुया, औरंगजेब नेमकं काय करत होता?