Chhaava Box Office Collection: बॉलीवूडमध्ये (Bollywood) दर आठवड्याला नवे चित्रपट प्रदर्शित होतात, पण काही मोजकेच चित्रपट मनांवर राज्य करतात. यावेळी विक्की कौशलच्या (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) चित्रपटानंही तेच केलं. या चित्रपटानं केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवर (Box Office) प्रचंड नफाही मिळवला आणि शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ब्लॉकबस्टर 'जवान'ला मागे टाकले. हा चित्रपट वीरता, देशभक्ती आणि इतिहासाची खोली मोठ्या पडद्यावर आणण्यात यशस्वी झाला आहे. विक्की कौशलच्या अभिनयानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि चित्रपटाला एका नव्या उंचीवर नेलं. जाणून घेऊयात 'छावा' चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील तिसरा सर्वात मोठा हिट चित्रपट कसा बनला? आणि त्याच्या यशामागील रहस्य काय? त्याबाबत सविस्तर...
विक्की कौशलचा 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर बनवलेल्या या चित्रपटानं आपल्या प्रभावी पटकथेनं, उत्तम अभिनयानं आणि देशभक्तीच्या भावनेनं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. 'जवान' आधीच तिसऱ्या स्थानावर होता, तर 'छावा' त्याला मागे टाकत तिसरा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला. ही कामगिरी विक्की कौशलच्या कारकिर्दीतील एक मोठा टर्निंग पॉईंट ठरली.
बॉक्स ऑफिस कलेक्शनची स्पर्धा
'छावा'नं आतापर्यंत 598.8 कोटी रुपये कमावले आहेत, तर शाहरुख खानच्या 'जवान'चं एकूण कलेक्शन 640 कोटी रुपये होतं. दोन्ही चित्रपटांची चांगली सुरुवात झाली, पण 'छावा'ची कमाई हळूहळू वाढत गेली. 'छावा' चित्रपट तेलुगू भाषेतही प्रदर्शित झाला, जिथे त्याला सुमारे तीन आठवडे उत्तम प्रतिसाद मिळाला. दक्षिण भारतीय प्रेक्षकांनीही या चित्रपटाचं कौतुक केलं आणि म्हणूनच या चित्रपटानं तेलुगू आवृत्तीतून अतिरिक्त 16 कोटी रुपये कमावले. टाईम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, आता 'छावा'ची भारतातील एकूण कमाई 599.15 कोटी रुपयांवर पोहोचली आहे आणि लवकरच हा 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणारा हिंदी चित्रपटसृष्टीतील सातवा चित्रपट बनू शकतो. याआधी 'जवान', 'कल्की 2898 एडी', 'आरआरआर', 'केजीएफ 2' आणि 'पुष्पा 2' सारखे मोठे चित्रपट या एलिट लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहेत.
'हिट' झाल्यानंतर आता 'सुपरहिट' बनण्याची तयारी
'छावा' च्या प्रचंड यशानंतर, विक्की कौशल आता त्याच्या कारकिर्दीतील काही सर्वात मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. येत्या वर्षात, तो संजय लीला भन्साळी यांच्या 'लव्ह अँड वॉर' या मोठ्या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि बॉक्स ऑफिसवर यशच्या 'टॉक्सिक' सोबत टक्कर देईल. याशिवाय, विक्की 'महावतार' मध्ये देखील दिसणार आहे, जो अमर कौशिक दिग्दर्शित करत आहे. हा चित्रपट पौराणिक कथा आणि आधुनिक कथेचा एक अनोखा मिलाप असेल, अशी माहिती मिळत आहे. त्यानंतर विक्की कौशल 'एक जादूगर' मध्ये दिग्दर्शक शुजित सरकारसोबतही काम करणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांना त्याच्याकडून पुन्हा एकदा दमदार अभिनयाची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :