Celebrity Gets Threat : चित्रपट (Film Industry) आणि टीव्ही इंडस्ट्रीला (TV Industry) हादरवणारी एक बातमी समोर येत आहे. राजपाल यादव (Rajpal Yadav), रेमो डिसूझा (Remo D'Souza) आणि सुगंधा मिश्रा (Sugandha Mishra) यांना धमकीचा ईमेल (Threatening Email) आला आहे. धमकी मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीनं 8 तासांच्या आत या तिन्ही स्टार्सकडून प्रतिसाद मिळाला नाहीतर, तो आवश्यक ती पावलं उचलेलं, असं म्हटलं होतं. सेलिब्रिटींच्या तक्रारीवरुन पोलिसांनी FIR नोंदवला आहे. सध्या याप्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादव, रेमो डिसूझा आणि सुगंधा मिश्रा यांना एक ईमेल आला होता. हा धमकीचा ईमेल होता. सुगंधाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एनसी आणि राजपाल यादवच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. रेमो डिसोझाकडूनही तक्रार मिळाली आहे. राजपाल यादव हा एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. तो शेवटचा कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' चित्रपटात दिसला होता. रेमो डिसूझा एक प्रसिद्ध कोरिओग्राफर आहे आणि सुगंधा मिश्रा एक विनोदी कलाकार आहे. ती कपिल शर्माच्या शोमुळे घराघरात पोहोचली. 


पाकिस्तानातून आला ईमेल 


सुत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, ईमेल करणाऱ्यानं शेवटी 'BISHNU' असं लिहिलं आहे. दावा केला जात आहे की, ईमेल पाकिस्तानातून करण्यात आलेला आहे. या ईमेलमध्ये लिहिलं गेलं आहे की, "आम्ही तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहोत. आम्हाला वाटते की एक संवेदनशील बाब तुमच्या लक्षात आणून देणे महत्त्वाचे आहे. हा प्रसिद्धीचा स्टंट नाही किंवा त्रास देण्याचा प्रयत्न नाही."


ईमेलमध्ये पुढे लिहिण्यात आलं आहे की, "आम्ही तुम्हाला हा मेसेज गांभीर्यानं आणि गोपनीयतेनं हाताळण्याची विनंती करतो. जर असं केलं नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील. याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावरही होईल. आम्हाला पुढील 8 तासांत तुमच्याकडून त्वरित प्रतिसादाची अपेक्षा आहे. जर आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्ही असं गृहीत धरू की, तुम्ही हे प्रकरण गांभीर्यानं घेत नाही आहात आणि आवश्यक ती कारवाई करू. विष्णू."


कॉमेडियन कपिल शर्मालाही धमकी 


राजपाल यादव, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसोझा यांच्यानंतर आता विनोदी कलाकार कपिल शर्मालाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. यापूर्वी राजपाल यादव, टीव्ही अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांनाही पाकिस्तानमधून धमकीचे ईमेल आले होते. धमकी देणाऱ्या व्यक्तीनं कपिल शर्माला त्याच्या कुटुंबासह, नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणात, आंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बीएनएसच्या कलम 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kapil Sharma : मोठी बातमी! कपील शर्माला जीवे मारण्याची धमकी, बॉलिवुडमध्ये खळबळ; नेमका कोणाचा हात?