Actor Vijay Oppose CAA :   केंद्र सरकारने सोमवारी सायंकाळी नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबतचा (CAA) अध्यादेश जारी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा अध्यादेश काढण्यात आल्याने चर्चांना उधाण आले. राजकीय पक्षांकडून सावध प्रतिक्रिया दिली जात असताना दुसरीकडे  दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजय याने सीएए कायद्याला विरोध केला आहे. हा कायदा अस्वीकाहर्य असून राज्यात याची अंमलबजावणी होऊ नये असे आवाहन त्याने  राज्य सरकारला केले आहे. 


विजय थलापतीने काय म्हटले?


थलपती विजय याने एक निवेदन जारी केले. तामिळनाडूमध्ये सीएए लागू होऊ देणार नाही, असेही त्याने स्पष्ट केले. अजूनही आपल्या देशात सर्व नागरीक सामाजिक सद्भावाने वास्तव्य करत आहेत, अशावेळी भारतीय नागरिकता संशोधन कायदा 2019 (CAA) सारख्या कायद्याची आवश्यकता नाही आणि असा कायदा स्वीकार्ह नसल्याचेही थलपती विजयने स्पष्ट केले. 


तामिळनाडू सरकारला आवाहन 


अभिनेता विजयने तामिळनाडू सरकारला आवाहन करताना म्हटले की,  सीएए हा कायदा तामिळनाडूमध्ये लागू होणार याकडे नेत्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे विजय याने म्हटले. सरकारला आवाहन करतानाही त्याने हा कायदा लागू करू नये असेही त्याने म्हटले. 


सीएए कायदा काय आहे?


सीएएचा कायदा कोणत्याही व्यक्तीला स्वत:हून नागरिकत्व बहाल करत नाही. हा कायदा 31 डिसेंबर 2014 पर्यंत किंवा त्यापूर्वी पाकिस्तान, भारत आणि बांगलादेशातून भारतात आले आहेत. अशा लोकांसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. पाकिस्तान आणि बांगला देशातील शरणार्थींना नागरिकत्व बहाल करण्याच्या दृष्टीने हा कायदा बनवण्यात आला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये हिंदूंचा छळ होतो, ते लोक भारतात शरणार्थी म्हणून येत असतात, त्यांना आपल्याला नागरिकत्व बहाल करायचे आहे, असे गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केले होते. भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी शरणार्थींना त्यांच्या देशात धार्मिक अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करावे लागणार आहे. याबाबत संविधानाच्या आठव्या सूचीत महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.