Bunny Marathi Movie : आपला चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी चित्रपटाचे निर्माते कलावंत वेगवेगळ्या कल्पक योजना आखतात, ठिकाणं निवडतात. आपलं प्रमोशन इतरांपेक्षा वेगळं असावं, रसिकांनी त्याची दखल घेऊन आपली कलाकृती पहाण्याची उत्सुकता दाखवावी, चार कौतुकाचे शब्द बोलावेत यासाठी हा सगळा प्रपंच सुरू असतो. अशीच एक चमकदार कल्पना अखून निर्माते शंकर धुरी आणि दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांनी ती प्रत्यक्षात उतरवली देखील आहे.


‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित 'बनी' (Bunny) या चित्रपटाचा फर्स्टलूक 75व्या 'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’दरम्यान (Cannes Film Festival 2022) 'इंडिया पॅव्हेलियन'मध्ये करण्यात आला. या मराठी भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यावर रसिकांची उत्सुकता शिगेला पोहचली आणि चित्रपटाचे पोस्टर उघडताच प्रेक्षकांनी त्यासोबत सेल्फी छायाचित्रे काढत आपल्या पसंतीची पावती दिली.


'बनी' ही पहिलीच कलाकृती


मेकर्सनी आपल्या पहिल्या-वहिल्या 'बनी' या चित्रपटाचं आणि प्रसिद्धीचं कॅम्पेन जगप्रसिद्ध कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सत करून मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धीची नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचा प्रयत्न केला आहे. शंकर धुरी हे गेली अनेक वर्ष अनेक यशस्वी चित्रपटांच्या निर्मितीची कार्यकारी धुरा सांभाळत आहेत. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांसोबत चित्रपट निर्मितीच्या अनुभवांचं भारदस्त गाठोडं घेऊन पदार्पण करणाऱ्या निर्माते शंकर धुरी यांची 'बनी' ही पहिली कलाकृती असून, ती नीट आणि आशयपूर्ण पद्धतीने आपल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहचावी म्हणून त्यांनी कान्सचे व्यासपीठ निवडल्याचे म्हटले आहे.


मराठी चित्रपटाचे सीमोल्लंघन!


आपला मराठी चित्रपट सीमोल्लंघन करून जगभरातील जिज्ञासू, रसिकांसमोर या पूर्वीच पोहचला आहे. चित्रपटाचा विषय आणि त्याविषयीचं कुतुहल निर्माण करण्याचं काम गेली अनेक वर्ष आपले मराठी चित्रपट चोख करीत आहेत, "जगभरातील सुजाण प्रेक्षक आपल्या चित्रपटांचे मनःपूर्वक कौतुक करतात, तेव्हा खरा आनंद होतो आणि त्याहून अधिक जेव्हा प्रेक्षक चित्रपटगृहात तिकीट काढून चित्रपट पाहतात", असे उद्गार दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांनी काढले. कान्स सोबत सुरु झालेला हा प्रवास भारतासह जगभरातील इतर मानांकित महोत्सव व पुरस्कारांमध्ये सुरु ठेवणार असल्याचे या महोत्सवाचे क्युरेटर मोहनदास यांनी सांगितले.


हेही वाचा :


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


June Movie Release : जून महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'पृथ्वीराज'पासून 'जुग जुग जिओ'पर्यंत बिग बजेट सिनेमे होणार प्रदर्शित