मुंबई : अमेरिकन पॉप गायिका (Pop Singer) ब्रिटनी स्पीअर्स (Britney Spears) नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशन आयुष्यामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती घटस्फोटामुळे चर्चेत आली आहे. ब्रिटनी स्पीअर्सने पती सॅम असगरी (Sam Asghari) पासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. ब्रिटनी स्पीअर्स आणि सॅम असगरी यांनी घटस्फोट घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, या संदर्भात दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटस्फोटानंतर सॅम असगरीने ब्रिटनी स्पीअर्सला धमकी दिल्याचीही चर्चा आहे.
पॉप स्टार ब्रिटनी स्पिअर्सचा तिसऱ्यांदा संसार मोडला
काही काळापूर्वी ब्रिटनी स्पीअर्सने तिचा प्रियकर सॅम असगरीसोबत लग्न केलं, पण आता हे लग्नही टिकलं नसल्याचे दिसून येत आहे. ब्रिटनी स्पीअर्सने तिच्यासोबत फसवणूक केल्याचा आरोप केल्यानंतर आता तिच्या पतीपासून विभक्त झाली आहे. ब्रिटनी स्पीअर्सचा तिसऱ्यांदा संसार मोडला आहे.
12 वर्षाने लहान पतीने घटस्फोटावेळी दिली 'ही' धमकी
अमेरिकन पॉप गायिका ब्रिटनी स्पीअर्सने पती सॅम असगरीसोबत घटस्फोट घेतल्याचं बोललं जात आहे. पॉप स्टार ब्रिटनीने अवघ्या 14 महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड सॅम असगरीसोबत लग्न केलं होतं. मात्र, आता त्यांच्या घटस्फोट झाल्याचं बोललं जात आहे. सॅमने ब्रिटनीची वैयक्तिक माहिती लीक करण्याची धमकी दिल्याचंही बोललं जात आहे. याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती अजून समोर आलेली नाही.
सॅमचे विवाहबाह्य संबंध असल्याचा ब्रिटनीचा आरोप
जस्ट जेरेडच्या रिपोर्टमध्ये सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 41 वर्षीय पॉप सुपरस्टार ब्रिटनी स्पीअर्स आणि तिचा 29 वर्षीय पती सॅम असगरी एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. अमेरिकन मीडिया TMZ च्या वृत्तानुसार, या जोडप्यामध्ये विवाहबाह्य संबंधांच्या आरोपांवरून भांडण झालं आणि त्यानंतर यांचा घटस्फोट झाला. ब्रिटनीने सॅमचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. सॅम आणि ब्रिटनीने घटस्फोटाची कागदपत्रे दाखल केली आहे. दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चांवर दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.