Jalgaon Municipal Corporation Election 2026: अखेर आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या (Jalgaon Election 2026) प्रचार रिंगणात उतरले आहेत. आज (6 जानेवारी) इच्छादेवी चौफुलीवरील इच्छादेवी मंदिरात त्यांच्या हस्ते महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महापालिका निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी खडसे यांनी प्रकृतीचे कारण देत नाकारली होती. मात्र, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जळगावात असतानाच खडसे यांचीही प्रचारात सक्रिय उपस्थिती दिसून आली, त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. आता एकनाथराव खडसे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणार का, आणि त्या सभांमधून ते कोणती भूमिका मांडणार, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागून आहे.
Eknath Khadse on NCP : राष्ट्रवादीचा डीएनए एकच, दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येतील यातशंकानाही
दरम्यान, राष्ट्रवादीचा डीएनए एकच असल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येतील याची शक्यता नाकारता येत नाही. असं मोठे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? या प्रश्नावर आमदार एकनाथ खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान मुंबईच्या महापौर पदाबाबत सत्ताधारी पक्षाकडूनकेलेल्या वक्तव्यावरबोलतानातेम्हणालेकि, मुंबईत महापौर पदावरून भाजपमध्ये मराठी, हिंदू असे मतभेद आहेत. महाराष्ट्रमध्ये जाणारा मराठी हिंदू अशी वेगळी व्याख्या चंद्रशेखर बावनकुळे मराठीची करतायत. भाजपकडून मराठी माणसाबद्दलच्या व्याख्या वेगवेगळ्या केल्या जात असल्याचेतेम्हणाले.
Eknath Khadse on BJP : पूर्वीचा भाजप आणि आत्ताचा भाजप यात मोठा फरक
दुसरीकडे पुण्यात अजितदादा विरुद्ध भाजप असा शाब्दिक संघर्ष रंगतानादिसतोय. यावरबोलतानाएकनाथखडसेम्हणालेकि, सत्तेसाठी हे सर्व एकत्र आलेले आहेत. पूर्वीचा भाजप आणि आत्ताचा भाजप यात मोठा फरक आहे. पूर्वी भाजपकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन होता. आता अनेक भ्रष्टाचारी लोक, आणि गुंड प्रवृत्तीचे लोक आज या पक्षांमध्ये येताना दिसत आहे.. आणि राजरोसपणे गुंडांना टिकीट दिल जात आहे. त्यामुळे पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा आजचे चित्र हे फार वेगळा असल्याचीप्रतिक्रियाएकनाथखडसेंनीदिलीय.
