Boney Kapoor interview about Sridevi final moments: बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार अर्थात श्रीदेवी आज आपल्यात नाही. परंतु, आजही त्यांचे चित्रपट आणि गाणी आवडीने पाहिले जातात. 24 फेब्रुवारी 2018 रोजी त्यांची अचानक निधनाची बातमी समोर आली. त्यांच्या निधनाने केवळ कुटुंबालाच नव्हे तर, देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला. या सुंदर  अभिनेत्रीनं जगाचा निरोप घेतल्यानंतर चाहते शोकसागरात बुडाले होते.  पण त्यांचं निधन नेमकं कसं झालं? या प्रश्नावर अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूमागचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.  दरम्यान, बोनी कपूर यांनी श्री देवी यांच्या मृत्यूमागचे खरं कारण सांगितले आहे.  हे ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

अभिनेत्री श्री देवी यांचे दुबईमध्ये निधन झाले. तिथे त्यांनी एका लग्नात हजेरी लावली होती.  ज्या हॉटेलच्या रुममध्ये त्या राहत होत्या, त्याच खोलीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  मीडिया रिपोर्ट्सनुसार,  श्रीदेवी या त्यांच्या आगामी चित्रपटासाठी तयारी करत होते. त्यामुळे ते आपल्या फिटनेसकडे बारकाईने लक्ष देत होते.  दरम्यान, त्यांना आधीच रक्तदाबाचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यांना कोणताही कडक आहार न फॉलो करण्याचा सल्ला दिला होता. 

श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर,  पती बोनी कपूर यांची कसून चौकशी करण्यात आली होती.  अलिकडेच, द न्यू इंडियनला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी या प्रकरणाच्या संबंधित अनेक खुलासे केले. बोनी कपूर म्हणाले, 'श्रीदेवी कडक आहाराचे पालन करत होती.  ज्यामध्ये मीठ वगळण्यात आले होते.  यामुळे ती कधी कधी बेशुद्ध पडायची', अशी माहिती बोनी कपूर यांनी दिली. 'हा एक नैसर्गिक मृत्यू नव्हता. तो एक अपघाती मृत्यू होता. चौकशीत मी सुमारे 24 ते 48 तास याबद्दल बोललो आहे, पुढे याबद्दल बोलू नये असे ठरवले होते', असं बोनी कपूर म्हणाले.

श्रीदेवीच्या जीवनशैलीबद्दल बोलताना बोनी कपूर म्हणाले, 'ती नेहमी उपाशी राहत होती. कारण तिला सुंदर दिसायचे होते.  जेव्हा तिचे माझ्यासोबत लग्न झाले होते, तेव्हा तिला बऱ्याचदा ब्लॅकआउटचा त्रास झाला होता.  डॉक्टरांनी तिला लो बिपीचा त्रास असल्याचे सांगितले होते', अशी माहिती त्यांनी दिली. 'लग्नानंतर मला कळले की श्रीदेवी मीठाशिवाय अन्न खात होती. तिनं आपल्या डाएटवर कंट्रोल ठेवले होते. मला कल्पना नव्हती की असं काही घडू शकतं. मृत्यूपूर्वी तिला वारंवार चक्कर येत होती.  विश्रांती घेण्यासाठी ती तिच्या खोलीत गेली होती. जेव्हा ती बाथरुममध्ये गेली, त्यानंतर ती खोलीबाहेर आलीच नाही',  असं बोनी कपूर यांनी सांगितलं.