Sara Ali Khan Vicky Kaushal Zara Hatke Zara Bachke Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान सध्या 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 


'द केरळ स्टोरी', 'स्पायडर मॅन : अक्रॉस द स्पायडर-वर्स' आणि 'चौक', 'रावरंभा'सारखे हिंदी-मराठी सिनेमे तिकीटबारीवर तुफान गर्दी खेचत आहेत. पण तरीही विकी-कौशल आणि सारा अली खानचा 'जरा हटके जरा बचके' हा हलका-फुलका सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी झाला असल्याचं दिसून येत आहे. 


'जरा हटके जरा बचके'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Zara Hatke Zara Bachke Box Office Collection)


'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी (ओपनिंग डे) 5.49 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी 7.20 कोटी, तिसऱ्या दिवशी 9.90 कोटी आणि चौथ्या दिवशी 4.14 कोटींची कमाई केली आहे. विकेंडला 'जरा हटके जरा बचके' या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. एकंदरीत आतापर्यंत या सिनेमाने 26.73 कोटींचा गल्ला जमवला आहे. 



  • पहिला दिवस : 5.49 कोटी

  • दुसरा दिवस : 7.20 कोटी

  • तिसरा दिवस : 9.90 कोटी

  • चौथा दिवस : 4.14 कोटी

  • एकूण कमाई : 26.73 कोटी






'जरा हटके जरा बचके' या सिनेमाची घौडदौड पाहता लवकरच हा सिनेमा 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल. 40 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'जरा हटके जरा बचके' हा रोमँटिक विनोदी सिनेमा आहे. एका जोडप्याची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. सिनेमात विकी कौशल कपिलच्या तर सारा सौम्याच्या भूमिकेत आहे. या सिनेमातील ट्विस्ट प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करतात. मॅड्रॉक फिल्म्स आणि जियो स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.


'जरा हटके जरा बचके'च्या स्टारकास्टबद्दल जाणून घ्या...


'जरा हटके जरा बचके' या सिनेमात विकी कौशल (Vicky Kaushal) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिकेत आहेत. विकी-सारासह  ईनामउलहक, नीरज सूद, राकेश बेदी, शारिब हाशमी, सुष्मिता मुखर्जी हे कलाकारदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 


संबंधित बातम्या


Zara Hatke zara Bachke: सारा आणि विकीच्या 'जरा हटके जरा बचके' चित्रपटानं पहिल्या दिवशी केली एवढी कमाई; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन