VIDEO : गोवा विमानतळावर युवराज-हेझलचे ठुमके
एबीपी माझा वेब टीम | 04 Dec 2016 04:14 PM (IST)
मुंबई : युवराज सिंह आणि हेझल कीच हे नवदाम्पत्य लग्नानंतरचे क्षण एन्जॉय करताना दिसत आहेत. विमानतळावर युवी आणि हेझलच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गोवा विमानतळावर युवराज आणि हेझल एका पंजाबी गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहेत. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी विमानतळावर प्रवाशांनीही गर्दी केली आहे. 30 नोव्हेंबरला चंदिगडच्या फतेहगढ साहिबमधल्या गुरुद्वारात दोघांचं लग्न झालं. दोन डिसेंबरला गोव्याच्या मोरझिममध्ये हिंदू परंपरेनुसार विवाहसोहळा झाला. दिल्लीत सात तारखेला युवराज-हेझलच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. टीम इंडियाचा सिक्सरकिंग अशी युवराजची ओळख आहे, तर हेझल कीच ब्रिटीश मॉडेल आणि अभिनेत्री आहे. पाहा व्हिडिओ :