चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत आगामी '2.0' म्हणजेच 'रोबो 2' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याची माहिती आहे. एक सीन शूट करताना त्यांना पडल्याने गुडघ्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
सिनेमातील एका महत्वाच्या सीनची शूटिंग करताना पडून रजनीकांत यांच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली, अशी माहिती यूनिटच्या एका व्यक्तीने दिली. त्यानंतर त्यांना चेट्टीनाड या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
https://twitter.com/RIAZtheboss/status/805105441378168833
रजनीकांत यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. रजनीकांत यांचे व्यवस्थापक रियाज अहमद यांनी रजनीकांत कारमध्ये बसतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
2.0 हा दिग्दर्शक एस. शंकर यांचा 400 कोटी बजेटचा सिनेमा आहे. यामध्ये रजनीकांत यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार, एमी जॅक्सन यांची प्रमुख भूमिका आहे.