Ravina Tandon And MM Keeravani Gets Padma Shri Award : पद्म पुरस्कारांची (Padma Shri Award) घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दिल्लीत हा पुरस्कार सोहळा पार पडला. यंदा सिनेसृष्टीतील योगदानासाठी बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Ravina Tandon) आणि ऑस्कर विजेत्या 'आरआरआर' (RRR) सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) या गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी (MM Keeravani) यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  


सिनेसृष्टीतील योगदानासाठी रवीना टंडनचा पद्मश्री पुरस्काराने गौरव


बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनला सिनेसृष्टीतील योगदानासाठी तसेच समाजसेवेसाठी 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर रवीना म्हणाली,"मला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. माझ्या कामाची दखल घेतल्याबद्दल भारत सककारचे खूप खूप आभार. तसेच या प्रवासात मला मार्गदर्शन केलेल्या सर्वांचे मी आभार मानते". 






ऑस्कर विजेत्या एमएम कीरावनी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित


रवीना टंडनसह 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू-नाटू' या लोकप्रिय गाण्याचे संगीतकार एमएम कीरावनी यांनादेखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एमएस कीरावनी यांच्या 'नाटू-नाटू' या गाण्याला 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscar 2023) बेस्ट ओरिजनल सॉन्ग या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला होता. आता त्यांनी आणखी एका मानाच्या पुरस्कारावर आपल्या मानाची मोहोर उमटवली आहे. 






दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला पद्म पुरस्कार सोहळा


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत पद्म पुरस्कार (Padma Awards) सोहळा पार पडला. रवीना टंडन आणि एमएम कीरावनी यांच्यासह तबलावादक झाकीर हुसेन (Zakir Hussain) आणि तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्श्वगायिका वाणी जयराम यांना अनुक्रमे पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. झाकीर हुसेन यांना याआधी 1998 मध्ये पद्मश्री आणि 2002 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.


संबंधित बातम्या


Raveena Tandon : रवीना टंडनला 'पद्मश्री पुरस्कार'; कलाविश्वातील कामगिरीचा सन्मान