मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागलेल्या पैलवान योगेश्वर दत्तवर सलमान खानच्या चाहत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सलमानची रिओच्या ब्रँड अॅम्बेसेडरपदी निवड झाल्यानंतर योगेश्वरने सवाल उपस्थित केला होता.

 
'कुठेही जाऊन आपल्या सिनेमाचं प्रमोशन करावं, या देशात तुम्हाला तो अधिकार आहे, पण रिओ ऑलिम्पिक ही ती जागा नाही. पीटी उषा, मिल्खा सिंग यांसारख्या दिग्गज क्रीडापटूंनी कठीण काळात देशासाठी मेहनत घेतली. मात्र खेळाच्या क्षेत्रात या (सलमान) अॅम्बेसेडरने काय केलं', असा प्रश्न योगेश्वरने ट्विटरवर उपस्थित केला होता.

 

https://twitter.com/DuttYogi/status/723917297417474049

 

https://twitter.com/DuttYogi/status/723918030753902594

 
योगेश्वर दत्त रिकाम्या हाती परतत असल्याचं पाहून सलमानच्या चाहत्यांचा भडका उडाला. 'आता सलमानमुळे हरलो, असं म्हणू नकोस' असं ट्वीट एकाने केलं आहे. तर  'सलमान खानवर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा सरावाकडे लक्ष दिलं असतंस, तर पदक मिळालं असतं' अशी टिपण्णीही एकाने केली आहे.

 

https://twitter.com/oneNnlyD/status/767360664163581952

 

https://twitter.com/AkkianFANGIRL/status/767340446695641088

 

https://twitter.com/being_monti/status/767333899827605504

 
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकवणाऱ्या योगेश्वर दत्तचं रिओ ऑलिम्पिकमधील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं होतं. योगेश्वरला सलामीच्या सामन्यात मंगोलियाच्या गांझोरिगकडून 0-3 अशी हार स्वीकारावी लागली.