Year Ender 2023 : छोट्या पडद्यावरील सासू-सुनेच्या मालिकांना (Marathi Serials) प्रेक्षकांची पसंती मिळते. पण कथाबाह्य कार्यक्रमदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अनेकदा सासू-सुनेच्या मालिका पाहण्यापेक्षा हे कथाबाह्य कार्यक्रम पाहायला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळते. 2023 या वर्षात अनेक कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आले. या कार्यक्रमांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. यात 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) या कार्यक्रमापासून ते 'बिग बॉस 17'पर्यंत (Bigg Boss 17) अनेक कार्यक्रमांचा समावेश होतो. 


खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi 14)


'खतरों के खिलाडी 14' या कार्यक्रमाचा डीनो जेम्स विजेता ठरला होता. या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय स्पर्धक सहभागी झाले होते. शीझान खान, अंजली आनंद, ऐश्वर्या शर्मा, अर्जित तनेजा, अर्चना गौतम, शिव ठाकरे, डेजी शाहसह अनेक स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रोहित शेट्टीने हा कार्यक्रम होस्ट केला होता. 


रोडीज : कर्म या कांड (Roadies Karm Ya Kaand)


'रोडीज'चं हे पर्वदेखील चांगलच गाजलं. सोनू सूदने (Sonu Sood) हा कार्यक्रम होस्ट केला होता. रिया चक्रवर्ती, गौतम गुलाटी आणि प्रिन्स नरूला गँग लीडर होते. रिया चक्रवर्तीने अनेक दिवसानंतर या कार्यक्रमाच्या माध्यमातून कमबॅक केलं होतं.


बिग बॉस 17 (Bigg Boss 17)


'बिग बॉस 17' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सर्व स्पर्धक प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहेत. सलमान खान (Salman Khan) हा कार्यक्रम होस्ट करत आहे. अंकिता लोखंडे, विकी जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, बाबू भैया, अरुण, ईशा मालवीय, समर्थ जुरैल, अभिषेक कुमार, रिंकू हे स्पर्धक 'बिग बॉस 17'मध्ये सहभागी झाले होते. 


झलक दिखला जा 11 (Jhalak Dikhhla Jaa)


'झलक दिखला जा 11' हा डान्स शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. मलायका अरोरा, फराह खान आणि अरशद वारसी यांनी हा कार्यक्रम होस्ट केला होता. शोएब इब्राहिम, विवेक दहिया, अंजली आनंद, तनिषा मुखर्जीसह अनेक स्पर्धक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम हिट व्हावा यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. 


कौन बनेगा करोडपती 15 (Kaun Banega Crorepati 15)


'कौन बनेगा करोडपती 15' हा कार्यक्रम अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळत आहे. चाहत्यांमध्येही या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. या कार्यक्रमात अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करतानाही दिसतात. 


टेम्पटेशन आयलँड


टेम्पटेशन आयलँड हा कार्यक्रम प्रेक्षकांना जियो सिनेमावर पाहता येईल. मौनी रॉय आणि करण कुंद्रा हा कार्यक्रम होस्ट करत आहेत. 


संबंधित बातम्या