Ranveer Singh: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनं जिंकतो. बँड बाजा बरात या चित्रपटातून रणवीरनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अनेक हिट चित्रपटांमध्ये रणवीरनं काम केलं. रणवीरनं नुकतीच Marrakech International Film Festival मध्ये हजेरी लावली. मोरक्कोमध्ये या फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये Etoile d'Or पुरस्कारानं रणवीरला सन्मानित करण्यात आलं. या इव्हेंटमध्ये रणवीरनं एक अनुभव चाहत्यांना सांगितला.
रणवीरनं सांगितला अनुभव
रणवीरनं इव्हेंटमध्ये त्याच्या बॉलिवूड जर्नीबाबत सांगितलं. तो म्हणाला, 'एका प्रसिद्ध निर्मात्याने त्यांच्या प्रायव्हेट पार्टीमध्ये मला बोलवलं होतं. या पार्टी दरम्यान त्या निर्मात्यानं एक कुत्रा माझ्या मागे सोडला. त्याने हे फक्त मजा करण्यासाठी केले होते' हा अनुभव सांगताना रणवीरनं त्या चित्रपट निर्मात्याचं नाव सांगितलं नाही.
12 वर्ष रणवीर अभिनय क्षेत्रात काम करत आहे. त्यानं जवळपास 20 चित्रपटांमध्ये काम केलं आहेत. त्यामधील 16 चित्रपट हे हिट होते. देशातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी रणवीर हा एक अभिनेता आहे.रामलीला,बाजीराव मस्तानी ,पद्मावत,83 या सुपरहिट चित्रपटांमध्ये रणवीरनं काम केलं.
रणवीर लवकरच रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सोबतच आलिया भट्ट देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन हे दिग्गज कलाकारदेखील या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: