World Cup 2023: पाकिस्तानी अभिनेत्री  सेहर शिनवारी (Sehar Shinwari) ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ट्वीटमुळे चर्चेत आहे. वर्ल्डकप  (World Cup 2023)  सुरु झाल्यापासून सेहर ही विविध ट्वीट्स शेअर करत होती. अनेक वेळा या ट्वीट्समुळे सेहरा नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केलं आहे. आता टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर सेहरने पुन्हा एक ट्वीट शेअर केलं आहे. तिच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


सेहर शिनवारीचं ट्वीट


वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर सेहरने एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये तिनं एका टीव्हीचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये टीव्हीची स्क्रिन तुटलेली दिसत आहे. या तुटलेल्या टीव्हीचा फोटो शेअर करुन सेहरनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "आज शेजारच्यांचे टीव्ही तुटत आहेत". या ट्वीटला कमेंट करुन अनेकांनी सेहरला ट्रोल केलं आहे. 


नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 


अनेक नेटकऱ्यांनी सेहरला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्यानं सेहरच्या ट्वीटला कमेंट करुन लिहिलं,"तुमच्याकडे तर आता तोडायला टीव्ही देखील उरले नाहीयेत. कारण ते दरवर्षी तुटतात. यावेळी तुम्ही 10 पैकी 6 सामन्यांमध्ये हारला आहात." तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, "आम्‍ही भारतीय पाकिस्‍तानींसारखी सामने हरल्‍याची तक्रार करत नाही." 






भारत हरल्यावर बांगलादेशच्या मुलासोबत डिनरला जाईन: सेहर


19 ऑक्टोबर रोजी पुण्यातील (Pune) महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) हा विश्वचषकाचा सामना झाला. यामध्ये टीम इंडियाचा विजय झाला. या सामन्याच्या आधी देखील सेहरनं एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटच्या माध्यमातून सेहरनं बांगलादेशमधील मुलांना डिनर डेटची  ऑफर दिली आहे. "इंशाअल्लाह, माझे बंगाली बंधू पुढच्या सामन्यात आमचा बदला घेतील. जर त्यांचा संघ भारताला पराभूत करू शकला तर मी ढाका येथे जाईन आणि बंगाली बॉयसोबत फिश डिनर डेटला जाईन", असं सेहरनं त्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं. पण भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये टीम इंडिया विजयी ठरल्यानं बांगलादेशमधील मुलासोबत डिनर डेटला जाण्याची संधी मिळाली नव्हती.






इतर महत्वाच्या बातम्या:


India vs Bangladesh: "बांगलादेशने पुण्यात भारताला हरवल्यास मी डिनर डेटला...."; पाकिस्तानी अभिनेत्रीची भलतीच ऑफर