मुंबई : मुंबईच्या चित्रकूट स्टुडिओमध्ये ‘हाऊसफुल 4’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी महिला डान्सरचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आलाय. शूटिंगेवळी काही लोक जबरदस्तीने स्टुडिओमध्ये घुसले. त्यावेळी आराडाओरडा केला असताना विनयभंग करण्यात आल्याचा आरोप महिला डान्सरने केला. पवन शेट्टी असे आरोपीचे नाव असून, तोही डान्सर म्हणूनच ‘हाऊसफुल्ल 4’ सिनेमाशी जोडला गेलाय. पवन शेट्टीविरोधात आंबोली पोलिस ठाण्यात 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
डान्सर आमीर शेख आणि पवन शेट्टी यांच्यात जुना वाद होता. त्याचा बदला घेण्यासाठी पवन शेट्टी आपल्या साथीदारांसह चित्रकूट स्टुडिओत जबरदस्तीने घुसला आणि त्याला बाहेर घेऊन जात होता. त्यावेळी महिला डान्सरने आरडाओरड केली. तेव्हा पवन शेट्टीने तिचा विनयभंग केला.
विनयभंगाची घटना घडली, त्यावेळी ‘हाऊसफुल्ल 4’ सिनेमाच्या शूटिंगसाठी सेटवर अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख हेही उपस्थित होते.
या सर्व प्रकरानंतर अक्षय कुमारने पीडित महिलेला पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास सांगितले. मग पीडित महिलेने इतर सहकाऱ्यांसोबत आंबोली पोलिस ठाणे गाठले आणि डान्सर पवन शेट्टीविरोधात तक्रार दिली. पवन शेट्टीविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करुन, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
‘हाऊसफुल्ल-4’च्या शूटिंगवेळी विनयभंग, महिला डान्सरचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Oct 2018 08:03 AM (IST)
विनयभंगाची घटना घडली, त्यावेळी ‘हाऊसफुल्ल 4’ सिनेमाच्या शूटिंगसाठी सेटवर अभिनेता अक्षय कुमार, बॉबी देओल आणि रितेश देशमुख हेही उपस्थित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -