बॉक्स ऑफिसवर 2017 अखेर सलमान आणि रणबीर आमनेसामने?
एबीपी माझा वेब टीम | 08 Jan 2017 01:56 PM (IST)
मुंबई : बॉक्स ऑफिसवर 2016 मध्ये अनेक सिनेमांची टक्कर पाहायला मिळाली. आता 2017 मध्येही असंच होण्याची चिन्हं आहेत. जानेवारीमध्ये शाहरुख खान आणि हृतिक रोशन आमनेसामने असतील तर वर्षाच्या शेवटी रणबीर कपूर आणि सलमान खान यांची टक्कर होण्याची शक्यता आहे. 25 जानेवारीला शाहरुख खानचा 'रईस' आणि हृतिक रोशनचा 'काबील' रिलीज होणार आहे. यापूर्वी देखील 2016 मध्ये अक्षय कुमारचा 'रुस्तम' आणि हृतिक रोशनाचा 'मोहेंजो दारो' एकाच दिवशी रिलीज झाले होते. 2017 मध्येही बॉक्स ऑफिसवर असाच सामना पाहायला मिळू शकतो. सलमान खानचा 'टायगर जिंदा हैं' हा सिनेमा 22 डिसेंबरला रिलीज होणार आहे. तर याच दिवशी आणखी एक सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तचा बायोपिक 22 डिसेंबरला रिलीज होण्याची शक्यता आहे. मात्र सिनेमाच्या लाँचिंगची अधिकृत घोषणा अजून बाकी आहे. या सिनेमात रणबीर कपूरने संजय दत्तचं पात्र साकारलं आहे.