मुंबई : करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूरची बर्थ डे पार्टी कोणत्याही मोठ्या सोहळ्यापेक्षा कमी नव्हती. तैमूरचा पहिला वाढदिवस खास बनवण्यासाठी सैफ आणि करीना आपल्या कुटुंबासह पतौडी पॅलेसमध्ये गेले होते. पण तैमूरच्या पार्टीला त्याचा भाऊ इब्राहिम आणि बहिण सारा मात्र हजर नव्हते.

खरंतर तैमूर हा इब्राहिम आणि साराचा लाडका भाऊ आहे. तसंच करीनाही या दोघांच्या अगदी जवळची आहे. त्यामुळे तैमूरच्या पहिल्या वाढदिवसाला सारा आणि इब्राहिमची अनुपस्थिती अनेकांना खटकत होती. पण या दोघांनी विराट आणि अनुष्काच्या मुंबईतील रिसेप्शनला मात्र हजेरी लावली होती.

तैमूरच्या वाढदिवसाला सारा तिच्या 'केदारनाथ' या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंग आणि वर्कशॉपमध्ये बिझी होती. त्यामुळे ती तैमूरच्या बर्थ डे पार्टीला येऊ शकली नाही. सध्या ती तिच्या करिअरबाबत अतिशय फोकस असल्याचं सांगितलं जात आहे.

तर दुसरीकडे लंडनमध्ये शिकणाऱ्या इब्राहिमला ख्रिसमसच्या सुट्टीत आई अमृतासोबत वेळ घालवायचा होता. त्यामुळे बहिण साराही मुंबईत असल्यानेमु त्याला तैमूरच्या बर्थ डेला जाता आलं नाही.

फक्त सारा आणि इब्राहिमच नाही तर मामा रणबीर कपूरही बिझी शेड्यूलमुळे तैमूरच्या पार्टीला हजर राहू शकला नाही.

पतौडी पॅलेसमध्ये तैमूरचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या पार्टीत बबिता, रणधीर कपूर, शर्मिला टागोर, करिश्मा कपूर, तिची दोन मुलं, अमृता अरोरा, तिचा नवरा आणि दोन मुलं हजर होती.