मुंबई : अभिनेता सैफ अली खानला नुकतंच चौथं अपत्य झालं आहे. सैफ अली खानला पहिल्या लग्नापासून सारा अली खान आणि इब्राहिम खान ही दोन मुलं आहे. त्याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंहसोबत झालं होतं. तर करीना कपूरसोबत त्याचं दुसरं लग्न झालं. करीना आणि सैफ यांची दोन मुलं आहेत. पहिल्या मुलाचं नाव तैमूर आहे तर दुसऱ्या मुलाचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही.



या लेखात सैफ अली खानचं पहिलं लग्न आणि घटस्फोट याबाबत जाणून घेऊया. सैफ अली खानने त्याच्यापेक्षा 12 वर्षाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री अमृता सिंहसोबत लग्न केलं होतं. 1991 मध्ये त्यांचा विवाह झाला होता तर 2004 मध्ये या दोघांचे मार्ग वेगळे झाले.



पैसे आणि सैफ अली खानच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स ही दोघांमधील वादाची प्रमुख कारणं होती, असं समजतं. घटस्फोटानंतरही बराच काळ सैफ अली खान आपल्या मुलांना भेटू शकला नव्हता, कारण कोर्टाने दोन्ही मुलांचा ताबा आई अमृता सिंहकडे दिला होता.



तर पोटगी म्हणून सैफ अली खानला अमृता सिंहला पाच कोटी रुपये द्यावे लागले होते. पोटगीच्या पैशांवरुन सैफ आणि अमृता यांच्यामध्ये वादही झाला होता. सैफने हे पैसे अमृताला दोन हफ्त्यांमध्ये दिले होते, अशीही चर्चा होती. अमृता सिंहसोबतचा संसार मोडल्यानंतर सैफ अली खानने 16 ऑक्टोबर 2012 रोजी अभिनेत्री करीना कपूरसोबत लग्न केलं होतं.