मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक श्रीमंत स्टार्स आणि अनेक श्रीमंत कुटुंबंही आहेत. बिग बी अमिताभ बच्चन, किंग खान शाहरुख खान, भाईजान सलमान खान, सुपरस्टार रणबीर कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची कोट्यवधींची मालमत्ता आहे. बॉलिवूडमधील श्रीमंत कुटुंबं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर खान, बच्चन किंवा कपूर कुटुंबाचं नावं समोर येतं. पण, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब यांच्यापैकी कुणी नसून वेगळंच आहे.
बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब
बॉलिवूडच्या श्रीमंत कुटुंबाकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे. अमिताभ बच्चन यांच्यापासून शाहरूख खानपर्यंत बॉलिवूडमधील अनेक कुटुंबे कोट्यवधीची कमाई करतात. पण, बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब कपूर किंवा बच्चन नाही. बॉलिवूडमध्ये एक असं कुटुंब आहे, ज्यामध्ये एकही सुपरस्टार नाही, पण कमाई आणि श्रीमंतीच्या बाबतीत हे कुटुंबा बॉलिवूडमधील इतर कुटुंबांना मागे टाकतं. बॉलिवूडमधील सर्वाधिक श्रीमंत कुटुंब आहे, कुमार कुटुंब. मीडिया रिपोर्टनुसार, कुमार कुटुंबाकडे सुमारे 10,000 हजार कोटींची मालमत्ता आहे.
टी-सीरीजचे मालक भूषण आणि कृष्ण कुमार
भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांचं कुटुंब टी-सीरीज कंपनीचे मालक आहेत. हुरुन इंडिया रिच लिस्ट 2022 नुसार, कुमार कुटुंबाची एकूण संपत्ती 1.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 10,000 कोटी रुपये आहे. त्यांचं उत्पन्न टी-सीरीज (T-Series) कंपनीमधून मिळते. टी-सीरीज ही निर्मिती आणि संगीत कंपनी आहे. T-Series चे जगातील दुसरे सर्वाधिक सबस्क्राइब केलेलं YouTube चॅनल आहे. कुमार कुटुंबाचा समावेश 200 श्रीमंत भारतीयांच्या यादीत होतो. कुमार कुटुंबातील इतर सदस्य, अभिनेत्री दिव्या खोसला, अभिनेत्री खुशाली कुमार आणि गायिका तुलसी कुमार, गायिका तान्या सिंह देखील इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.
गुलशन कुमार यांचं कुटुंब
गुलशन कुमार यांनी 1983 मध्ये टी-सीरीज कंपनी बनवली होती. आता या कंपनीचे मालक गुलशन यांची मुले भूषण आणि कृष्ण कुमार हे आहेत. भूषण कुमारची पत्नी दिव्या चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, पण तिला अभिनयात विशेष छाप पाडता आली नाही. भूषणची बहीण तुलसी ही गायिका असून तिने अनेक हिट गाणीही दिली आहेत. दुसरी बहीण खुशाली ही एक अभिनेत्री आहे, इंडस्ट्रीत स्वत:ची ओळख निर्माण करण्या प्रयत्नात आहे.
गुलशनचा भाऊ कृष्ण कुमार यानेही अभिनयात हात आजमावण्याचा प्रयत्न केलं, पण त्याला यश मिळालं नाही. सध्या कृष्ण कुमार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांची 21 वर्षांची मुलगी तिशा कुमारचा कर्करोगाने मृत्यू झाला आहे. 22 जुलै रोजी तिशाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलीच्या कृष्ण कुमार आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.