अझरची पहिली बायको प्राची देसाईला म्हणाली..
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2016 06:09 AM (IST)
मुंबईः टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या आयुष्यावर येत असलेल्या 'अझर' या सिनेमात अभिनेत्री प्राची देसाई महत्त्वाची भूमिका निभावत आहे. प्राची 'अझर'मध्ये मोहम्मद अझहरुद्दीनची पत्नी नौरीनच्या भूमिकेत दिसणार आहे. नौरीनची भूमिका निभावण्यासाठी प्राचीने खूप मेहनत घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून तीने स्वत: नौरानीची भेट घेतली. या भेटीनंतर नौरानीसोबतची भेट खूपच भावनिक होती, असं प्राची देसाई म्हणाली. 'नौरीनला भेटल्यावर माझं त्यांच्याबद्दलचं मत पूर्णपणे बदललं. त्यांच्यासोबत वेळ घालवल्यानंतर त्यांच्याशी एक भावनिक नातं निर्माण झालं' असं प्राचीने सांगितलं. नौरीन त्यांच्या भूतकाळाबाबत बोलण्यास जास्त उत्सुक नसल्याचं यावेळी जाणवलं. मात्र तरीही त्यांनी अनेक गोष्टी माझ्याशी शेअर केल्या. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. नौरीन अझरची पहिली प्रेमिका आणि पत्नी होती. त्यांनी अझर यांच्यासोबत 16 व्या वर्षीच लग्न केलं होतं. त्यामुळे एकंदरीतच नौरीन यांची भूमिका निभावणं खूपच आव्हानात्मक असल्याचं प्राची म्हणाली. दरम्यान अझर सिनेमात इम्रान हश्मी अझरुद्दीनची भूमिका साकारत आहे. याशिवाय नरगीस फाखरी आणि लारा दत्ताही या सिनेमात आहेत. येत्या 13 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.