Teya Dora Moye Moye : सध्या वेगवेगळ्या धाटणीचे, दर्जाचे सिनेमे (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमातील गाणीदेखील हिट होत आहेत. कितीही नवी गाणी आली तरी जुन्या गाण्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेलं 'मोये मोये' (Moye Moye) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आजही या गाण्याची चांगलीच क्रेझ आहे. युट्यूबवर या गाण्याला 57 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळले आहेत. 


'मोये मोये'चा सोशल मीडियावर धुमाकूळ


'मोये मोये' हे गाणं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्याचे इंस्टाग्राम रील्स, व्हिडीओ, युट्यूब शॉर्ट्सदेखील बनवले जात आहेत. निर्मात्यांनी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे गाणं रिलीज केलं आहे. खरंतर, 'मोये मोये' असे या गाण्याचे बोल नसून 'मोये मोर' असे आहेत. 


'मोये मोये' या गाण्याला भाषेचं बंधन नाही. जगभरातील संगीतप्रेमींच्या हे गाणं पसंतीस उतरलं आहे. "डेजनम' असे या गाण्याचे शीर्षक आहे. दोन मिनिट 57 सेकंदाचं हे गाणं अल्पावधीतच ट्रेडिंगमध्ये आलं आहे. लोकप्रिय गायिका आणि गीतकार तेया डोरा यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये त्यांची झलक पाहायला मिळत आहे. या गाण्याचे बोल सर्बियाई रॅपर स्लोबोदान वेल्कोविक कोबीने लिहिले आहेत.


'मोये मोये'ला युट्यूबवर मिळालेत 57 मिलियन व्ह्यूज


'डेजनम' या गाण्याला युट्यूबवर आतापर्यंत 57 मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 'मोये मोये' या गाण्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने तेया डोराने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तसेच सर्बियाई धुनचं जागतिक पातळीवर होणाऱ्या कौतुकाबद्दलही तिने भाष्य केलं आहे. 


'मोये' म्हणजेच 'मोर' या शब्दाचा सर्बियाईमध्ये 'दु:स्वप्न' असा अर्थ होतो. प्रेक्षकांना विचार करायला लावणारं हे गाणं आहे. उदासीनतेवर प्रकाश टाकणारं हे गाणं आहे. आसपासचं नकारात्मक वातावरण, निराशा या गोष्टींकडे दुर्लक्ष करता उज्जवल भविष्याचा विचार करण्यावर भाष्य करणारं हे गाणं आहे. वेगवेगळ्या संस्कृती आणि अनुभवांमुळे हे गाणं प्रेक्षकांना जोडून ठेवतं. 


तेया डोरा कोण आहे? (Who is Teya Dora)


तेया डोराचं खरं नाव टेओडोरा पावलोवस्का असं आहे. पण सर्बियाईमध्ये ती तेया डोरा या नावाने ओळखली जाते. तेया ही लोकप्रिय गायिका आणि गीतकार आहे. 'डेजानम' या बॅनरअंतर्गत तिने सर्वाधिक गाणी गायली आहेत. 






तेया डोराचा जन्म पावलोवस्कामध्ये 1992 रोजी झाला. अमेरिकेतील बर्कली कॉलेज ऑफ म्यूझिक या महाविद्यालयातून तिने संगीतक्षेत्रात शिक्षण घेतलं. गीतकार आणि संगीतकार म्हणून तिने संगीतक्षेत्रीतील करिअरची सुरुवात केली. 'दा ना मेनी जे' हे तिचं पहिलं गाणं होतं. पहिलचं गाणं तिचं सुपरहिट ठरलं होतं. दा ना मेनी जे, ओलुजा, यूलिस, यू अवैधी, वोजी मी, अटामाला अशी अनेक गाणी तिने गायली आहेत. 



संबंधित बातम्या


Salman Khan : सलमानचा 'Tiger 3' फ्लॉप की सुपरहिट? भाईजान म्हणतो,"दिवाळी आणि वर्ल्डकप फायनलचा सिनेमावर परिणाम"