Welcome 3: 'वेलकम' (Welcome) आणि 'वेलकम 2' (Welcome 2) या कॉमेडी चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. वेलकम चित्रपटाच्या तिसऱ्या (Welcome 3) भागाची आतुरतेने वाट पाहत होते. 'वेलकम 3' ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण आता 'वेलकम 3' चित्रपटाबाबत मुव्ही क्रिटिक तरण आदर्श यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ही पोस्ट शेअर करुन 'वेलकम 3' या चित्रपटाच्या नावाबाबत माहिती दिली आहे.
तरण आदर्श यांची पोस्ट
तरण आदर्श यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, 'फिरोज ए नाडियादवाला यांनी ‘वेलकम 3’ (Welcome 3) चित्रपटासाठी ख्रिसमस 2024 ला लॉक केले आहे. वेलकम टू द जंगल (Welcome To The Jungle) हा वेलकम चित्रपटाच्या फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाचे नाव आहे. निर्माता फिरोज नाडियादवाला यांनी 2024 च्या ख्रिसमसला हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.'
वेलकम ' (Welcome) या चित्रपटाच्या पहिल्या दोन भागात नाना पाटेकर (Nana Patekar) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. नाना पाटेकर यांनी या चित्रपटांमध्ये उदय शेट्टी ही भूमिका साकारली होती. तर अनिल कपूर यांनी मजनू ही भूमिका साकारली होती.
वेलकम हा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता तर वेलकम-2 म्हणजेच वेलकम बॅक हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. वेलकम या चित्रपटात अक्षय कुमारनं महत्वाची भूमिका साकारली होती तर वेलकम बॅकमध्ये अभिनेता जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत दिसला होता. वेलकम आणि वेलकम बॅक हे दोन्ही कॉमेडी चित्रपट होते. या चित्रपटांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. आता वेलकम-3 म्हणजेच वेलकम टू द जंगल या चित्रपटात कोणते कलाकार काम करणार आहेत, याबाबत जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
वेलकम टू द जंगल या चित्रपटात अक्षय कुमार अरशद वारसी (Arshad Warsi) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) हे काम करणार आहेत, असं म्हटलं जात आहे. पण याबाबत फिल्म मेकर्सनं अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
Welcome 3 : मजनू भाई आणि उदय शेट्टीचा पत्ता कट? 'वेलकम 3' मध्ये दिसणार 'हे' कलाकार