राकेश मारिया 1981 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. या वेबसीरीजमध्ये 1993 चे साखळी बॉम्बस्फोट, गेटवे आणि झवेरी बाजार बॉम्बस्फोट, मुंबईवरील 26/11 चा दहशतवादी हल्ला, नीरज ग्रोव्हर हत्याकांड, शीना बोरा हत्याकांड यासारख्या घटना दाखवल्या जाणार आहेत. मारिया गेल्या वर्षी होम गार्ड विभागाच्या पोलिस महासंचालकपदी निवृत्त झाले.
राकेश मारिया यांची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.
अनिल अंबानी यांच्या 'रिलायन्स एन्टरटेन्मेंट'च्या 'फॅण्टम फिल्म'तर्फे या सीरिजची निर्मिती केली जाणार आहे. फिलहाल, तलवार, राझी यासारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार या सीरिजचं दिग्दर्शन करणार आहेत.